💥भाजपा नेते तथा माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या जिंतूरात वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार....!


💥यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपा नेते विजय वरपुडकर यांची प्रमुख उपस्थिती💥


 
जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

माझ्या वाढदिवसाची भेट द्यायची झाल्यास जिल्ह्यात बीजेपीला घराघरात पोचवा असे वाढदिवसानिमित्त माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांनी आव्हान केले.येणाऱ्या काळात भाजपाला घराघरात पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून विविध योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचून माझ्या वाढदिवसानिमित्त भाजप घराघरात कसा पोहोचेल व तसेच येणाऱ्या जिल्हा परिषदेवर भाजपचा भगवा फडकवा हीच मला भेट मिळेल.जिंतूर येथील नगरेश्वर मंदिरात त्यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त ते बोलत होते.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपचे विजय वरपुडकर, मीनाताई बोर्डीकर,  चेअरमन भावना बोर्डीकर, सुंदरलाल सावजी बँकेचे माजी अध्यक्ष मुकुंद सावजी कळमकर, नयना बोर्डीकर पोलीस उप महानिरीक्षक सदानंद दाते, वसंतराव शिंदे,ब्रीज गोपाल तोष्णीवाल, सचिन गोरे, महालिंगप्पा कुर्हे, लक्ष्मण बुधवंत, सुनील भोंबे, आदी उपस्थित होते.यावेळी सत्काराला उत्तर देताना बोर्डीकर यांनी भाजप आणि सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या विविध योजना घराघरात पोहोचून भाजपा मजबूत करा अशी आव्हान केले .तर तीच खरी माझ्या वाढदिवसानिमित्त भेट होईल असेही ते म्हणाले.


या कार्यक्रमास भगवानराव वटाणे, सुनील मते, रवी घुगे, कृष्णा देशमुख, अशोक बुधवंत, संतोष देशमुख, गजानन घुगे, नामदेवराव घुले, संदीप आप्पा लकडे, सुभाष चंद्र काबरा, प्रा. गजानन वराड, केशव घुले, कैलास खंदारे, किरण वट्टमवार, संजय घुले, रमण तोष्णीवाल, गोविंद दायमा, प्रभाकर दराडे, गणेश कुरे, गोपाळ रोकडे, सुधाकर कुकडे, राजेंद्र थिटे,  सुधाकर जाधव, आदी कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या