💥परभणी जिल्ह्यातील पालम पोलिस स्थानकात कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक लाच मागितल्या प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात...!


💥दाखल गुन्ह्याचे तपासात मदत करतो म्हणून मागितली होती २५ हजार रुपयांची लाच💥

 परभणी (दि.१० आक्टोंबर) - परभणी जिल्ह्यातील पालम पोलिस स्थानकात कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक नामदेव उमाजी राठोड वय वर्षे ५४ यास फिर्यादीवर दाखल गुन्ह्यातील तपासात मदत करतो असे म्हणून दि.२३ सप्टेंबर २०२२ रोजी लाच मागितली होती य संदर्भात संबंधित ५२ वर्षीय तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दि.२३ सप्टेंबर २०२२ रोजी पडताळनी केली असता तक्रारीत सत्यता आढळून आली या संदर्भात आरोपी लोकसेवक नामदेव उमाजी राठोड, सपोउपनि (वर्ग-3), नेमणूक पोलीस ठाणे पालम जि.परभणी यांनी पोस्टे पालम गु.र.नं 167/22 कलम 326, 324, 323, 504, 506, 34 भादवि प्रमाणे तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांचेवर दाखल गुन्ह्याचे तपासात मदत करतो म्हणून तक्रारदार यांना पंचा समक्ष २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती आरोपी लोकसेवक यांना संशय आल्याने त्यांनी सदर लाचेची रक्कम स्विकारली नाही.  

      आलोसे नामदेव राठोड यांना आज सोमवार दि.१० आक्टोंबर २०२२ रोजी ताब्यात घेवून पोलिस स्टेशन पालम येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या