💥परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार : शेतकऱ्यांना ४० कोटी ७१ लाख रुपयांचा विमा वाटप होणार...!


💥लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा करण्यास कंपनीकडून सुरुवात💥 

परभणी (दि.२१ आक्टोंबर) : जिल्ह्यातील अन्नदाता शेतकरी बांधवांच्या हाता तोंडाला आलेला घास परतीच्या पावसाने पळवला असून शेतकऱ्यांच्या सोयाबीन/कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे ऐन दिपावली सनाच्या वेळेला शेतकऱ्यांना अक्षरशः अश्रू ढाळण्याची वेळ आली होती त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असतांना आनंदाची बातमी समोर आली असून पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे  झालेल्या नुकसानीसाठी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील आठ मंडळात ७३ हजार ८१४ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ४० कोटी ७१ लाख १२ हजार रुपये एवढी अग्रीम विमा भरपाई मंजूर करण्यात आली असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा करण्यास कंपनीकडून सुरुवात झाली आहे.

खरीप हंगाम २०२२ ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात २६ दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी ०६ सप्टेंबर २०२२ ला शासकीय अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधींना सोयाबीनच्या नुकसानीसंदर्भात संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या मंडळातील मागील ७ वर्षातील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत यंदा सरासरी उत्पादनात ५० टक्क्यापेक्षा अधिक घट झाली असल्याचे आढळून आले. यामध्ये सर्वाधिक परभणी तालुक्यातील तीन मंडळांचा समावेश आहे.

पीक विमा योजनेतील प्रतिकूल परिस्थिती मुळे झालेले नुकसान या जोखीम बाबीअंतर्गंत या आठ मंडळातील शेतकऱ्यांना संभाव्य विमा भरपाईपैकी २५ टक्के अग्रीम रक्कम महिन्याभरात देण्याचे आदेश  जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी आयसीआयसीआय लोम्बार्डं जनरल विमा कंपनीला ९ सप्टेंबर रोजी दिले होते. त्यानुसार या आठ मंडळातील सोयाबीनसाठी विमा संरक्षण घेतलेल्या सर्व ७३ हजार ८१४ शेतकऱ्यांना ४० कोटी ७१ लाख १२ हजार रुपये एवढी अग्रीम विमाभरपाई महसूल मंडळनिहाय मंजूर करण्यात आली. यासाठी प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धिरज कुमार, संचालक विस्तार विकास पाटील व मुख्य सांख्यिकी विनय आवटे यांचे मार्गदर्शन लाभले.

गंगाखेड तालुक्यातील माखणी मंडळातील १३,६२६ शेतकऱ्यांना ६६९७ प्रति हेक्टरीप्रमाणे ५.२६ कोटी, जिंतूर तालुक्यातील  दुधगाव मंडळातील ९,१८४ शेतकऱ्यांना ६,४२१ प्रमाणे ५.१६ कोटी, मानवत तालुक्यातील रामपुरी मंडळातील ६,०६३ शेतकऱ्यांना ६२४८ प्रति हेक्टरीप्रमाणे ३.९९ कोटी, परभणी तालुक्यातील जांब मंडळातील १०,९५३ शेतकऱ्यांना ६३९२ प्रतिहेक्टरी प्रमाणे ६.४० कोटी, परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळातील ८,०६३ शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ६,३६३ प्रमाणे ४.८० कोटी, झरी मंडळातील १०,५३७ शेतकऱ्यांना 6,193 प्रतिहेक्टरी याप्रमाणे  6.01 कोटी, पुर्णा तालुक्यातील चुडावा मंडळातील ८,७७८ शेतकऱ्यांना ७,०१८ प्रतिहेक्टरीप्रमाणे ४.३१ कोटी रुपये सोनपेठ मंडळातील ६,००५ शेतकऱ्यांना ६,७६३.८५  प्रतिहेक्टरी प्रमाणे  ४.१६ कोटी रुपयांची विमा भरपाई देण्यात येत असून ७३ हजार ८१४ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४०.७१ कोटी रुपये जमा होत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या