💥पुर्णेतील बळीराजा शिक्षण संस्था सोमेश्वर संचलित रामराव पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयात व्याख्यान...!


💥आयुर्वेद व आरोग्य विषयी महत्वपूर्ण व्याख्यान संपन्न💥


पुर्णा (दि.१७ आक्टोंबर) - पुर्णा येथील बळीराजा शिक्षण संस्था सोमेश्वर संचलित रामराव पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय येथे 75 व्या आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक १७ आक्टोंबर २०२२ रोजी आयुर्वेद डे चे मार्गदर्शन करण्यासाठी पूर्णा नगरपालिकेचे ब्रँडअँबेसिडर योगेश भाऊ खंदारे यांनी मुलांना आयुर्वेद व आरोग्य विषयी महत्वपूर्ण व्याख्यान दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे  प्राचार्य  डॉ.गोविंद लंगोटे हे होते,डॉ.सचिन लोणे , डॉ. विकास काशीकर , प्रशासकीय अधिकारी  श्री. अभयकुमार कदम ,कार्यालयीन  अधीक्षक ज्ञानोबा सातपुते , प्रशांत वाघोदे, माणिक हनुमंते,शेख शाबुद्दीन , गजानन शिंदे व विद्यार्थी उपस्थित  होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण डाखोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ सचिन लोने यांनी मांडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या