💥भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन....!


💥आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले💥

परभणी (दि.१५ आक्टोंबर) : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी नायब तहसिलदार प्रशांत वाकोडकर, स्वीय सहाय्यक कैलास मठपती  यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या