💥जिंतूर- सेलू विधानसभा मतदारसंघातील महावितरणचे प्रलंबीत कामे तात्काळ करा ?


💥प्रलंबीत कामाबाबत मा.आ.विजय भांबळेंनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या सोबत त्यांच्या दालनात बैठक घेतली💥

जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी रामपूरकर

जिंतूर -सेलु विधानसभा मतदारसंघातील महावितरण ची अनेक कामाबाबत मा.आ.विजयराव भांबळे यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या सोबत त्यांच्या दालनात बैठक घेतली. येणाऱ्या गावामध्ये महावितरण तर्फे कुठेही केबल, किटकॅट देण्यात आले नाहीत. अनेक डी.पी.ची दयनीय यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. चौधरी यांना मा.आ.विजयराव भांबळे  यांनी चांगलेच धारेवर धरले .जिंतूर-सेलू अंतर्गत  अवस्था झाली असून काही गावामध्ये गावठाण सप्लाय अजून सुद्धा पोहोचण्यात आलेला नाही. तसेच मौ.कान्हड ता.सेलू येथील सबस्टेशन ओव्हर लोड झाले असल्यामुळे त्या परिसरातील शेतकरी यांना शेतीपंपासाठी कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. यामुळे त्या परिसरातील १४ गावातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे या सबस्टेशनला अतिरिक्त ५ एम. व्ही. चा ट्रान्सफार्मर बसविल्यास शेतकर्यांना पाहिजे त्या प्रमाणात शेतीपंपासाठी वीज पुरवठा होऊ शकतो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. त्यात मौजे कान्हड, कुपटा, भांगापूर, सिमनगाव,गव्हा, तांदूळवाडी, गुळखंड, हट्टा, आडगाव दराडे, सेलवाडी,गायके पिंपळगाव , मारवाडी , टाकळी नीलवर्ण, मंगरूळ, निरवाडी लीपणे येथे गावठाण फिडर वर १०० के.व्ही. ट्रान्सफार्मर मंजूर करणे.  व मोरेगाव येथे गावठाण फिडर वर १०० के.व्ही. ट्रान्सफार्मर मंजूर करणे, जवळा जिवाजी येथे गावठाण फिडर वर १०० के.व्ही.च ट्रान्सफार्मर मंजूर करणे. नरसापूर गावठाण फिडर वर १०० के.व्ही.चा ट्रान्सफार्मर मंजूर करणे,वाई बोथ येथे गावठाण फिडर वर १०० के.व्ही.चा ट्रान्सफार्मर मंजूर करणे. वालूर सबस्टेशन अंतर्गत हातनूर येथे ए.जी. फिडर वर रात्रीचे सिंगल फेज सुरु करणे. २०१८ च्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी कोटेशन भरले आहे. त्या शेतकर्यांचे कामे अद्यापपर्यंत सुरु नाहीत ती कामे तात्काळ सुरु करण्यात यावी. 

तसेच जिंतूर शहराचा पाणीपुरवठा अनेक दिवसापासून एम.एस.ई.बी.विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने नेहमी बंद पडत आहे. तरी जिंतूर शहराच्या पाणीपुरवठा वीज  कनेक्शन हायड्रोमधून देण्यात यावा.  तसेच जिंतूर शहरात दोन फिडर आहेत नेमगिरी व हुतात्मा स्मारक ह्या दोनी फिडरवर सारखी लाईट राहत नाही. तरी दोन्ही फिडरचे मेंटेनन्स करून दोन्ही फिडरची लाईट तात्काळ सुरळीत करण्यात यावी.

या मागण्यांचे निवेदन यावेळी अधीक्षक अभियंता यांना देण्यात आले. यावेळी सदरील विविध प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावू असे आश्वासन अधीक्षक अभियंता यांनी दिले. यावेळी मनोज राऊत, सुधाकर रोकडे, रवी देशमुख, माऊली घुगे, तोडकर सर, चंद्रकांत गाडेकर, यांच्या सह राष्ट्रवादी चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या