💥महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ परभणी जिल्हा व जिंतूर तालुका प्रवासी महासंघाच्या वतीने जिंतूर आगार प्रमुखांना निवेदन...!


💥यावेळी जिंतूर एसटी डेपोचे व्यवस्थापक विश्वनाथ चिबडे यांनी योग्य प्रतिसाद देऊन सहकार्य करण्याचे दिले आश्वासन💥

जिंतूर/ प्रतिनिधी

जिंतुर ते पाथरी व्हाया परभणी, मानवत एसटी सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंध परभणी जिल्हा व जिंतूर तालुका कार्यकारीणीच्या वतीने जिंतूर एसटी आगार चे व्यवस्थापक विश्वनाथ चिबडे यांना निवेदन देण्यात आले.


दिलेल्या निवेदनात पाथरी येथील साईबाबा जन्म भुमीचे दर्शन करण्यासाठी येणाऱ्या साईभक्तांसाठी व जिंतूर जवळील जैनधर्मातील भाविकांना नेमगीरी देवस्थानचे दर्शनाचा लाभ मानवत व पाथरी येथील भाविकाना लाभ मिळावा म्हणून त्याच बरोबर जिंतुर व तालुक्यातील साईभक्तांना पाथरी येथील साईबाबा जन्म भुमीचे दर्शन करण्यासाठी येणाऱ्या साईभक्तांसाठी जिंतुर ते पाथरी अशी एसटी सेवा सुरू करण्यासाठी जिंतुर एसटी डेपो चे व्यवस्थापक विश्वनाथ चिबडे यांना दिनांक 8 ऑक्टोबर 22 रोजी निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे परभणी जिल्हा कार्यकरिणीचे अध्यक्ष के.डी.वर्मा व जिल्हा कार्यकरिणीच्या जिंतुर येथील महिला प्रतिनिधी सौ.जयश्री देशपांडे यांची स्वाक्षरी आहे.जिंतुर एसटी डेपो चे व्यवस्थापक चिबडे यांना निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे जिंतूर तालुकाध्यक्ष सचिन रायपत्रीवार उपाध्यक्ष महेश देशमुख, सचिव अॅड पंकज तिवारी, संघटक किशोर पारडे, कार्यध्यक्ष बाळासाहेब रामपुरकर, सहसंघटक संदीप माहुरकर, अमरजित राठोड, अर्जुन पालवे हे उपस्थित होते.

यावेळी जिंतूर एसटी डेपोचे व्यवस्थापक विश्वनाथ चिबडे यांनी योग्य प्रतिसाद देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.जिल्हा कार्यकरिणीच्या वतीने व जिंतूर तालुका कार्यकारीणीच्या वतीने आगार प्रमुख चिबडे यांचे आभार मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या