💥पुर्णा तालुक्यातील कान्हेगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष पदी सुरेश तातेराव बोकारे...!


💥तर उपाध्यक्ष पदी केशव कामाजीराव नवघरे यांची बिनविरोध निवड💥 

पूर्णा : - पूर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथे आज काल दि.०८ आक्टोंबर २०२२ रोजी शालेय व्यवस्थापन समिती निवड करण्या संदर्भात बैठक घेण्यात आली यावेळी दिलीप श्रुगाळपुतळे व सुधीर कऱ्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी व्यवस्थापन समिती निवडी साठी मार्गदर्शन म्हणून सरपंच प्रकाशराव बोकारे व चेअरमन सुभाषराव बोकारे हे उपस्थित होते.


यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सोपानराव बोकारे,पांडुरंग पारटकर,पुर्णा तालुका संभाजी सेनेचे तालुका प्रमुख गोविंद मोरे यांच्या मार्ग दर्शनाखाली शालेय व्यवस्थापन समिती बिन विरोध करण्यात आली असता शालेय व्यवस्थापत समितीचे अध्यक्ष म्हणून सुरेशराव तातेराव बोकारे उपाध्यक्ष म्हणून केशव कामाजी नवघरे तर सदस्य म्हणून दशरथ सोपान बोकारे,मंगल अंगद बोकारे,मीरा व्यंकटी नवघरे,सुनीता मारोती मोरे,अर्चना वैजेनाथ पारटकर,देवराव प्रकाश पारटकर,नारायण मुरलीधर गिरी,नंदा राम असोरे,सरस्वती राजेंद्र पारटकर,बबन भगवान पारटकर,नंदा जगन्नाथ सरोदे तर ज्ञानदेव सुभाषरावं बोकारे यांची निवड करण्यात आली. 

नवनिवारचित पदाधिकाऱ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक टि.के.बिरादार सर व सरपंच प्रकाशराव बोकारे शिक्षक लथाड सर,सोनकांबळे सर झळके सर गवळी सर खंदारे सर यांनी सर्वांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच पालक व गावकरी यांनी देखील नववर्चितांना शुभेच्या दिल्या व प्रमुख उपस्तीथी असलेले दिलीप श्रुगाळपुतळे सर व सुधीर कराळे सर यांचे पालकांकडून विशेष स्वागत करून सन्मानित करण्यात आले.

या शालेय शिक्षण समितीची निवडणूक हसत खेळत पार पडल्यामुळे सर्व शिक्षकांनी पालकांचे आभार व्यक्त केले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या