💥विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या विशेष शैक्षणिक कार्यक्रम व गुणगौरव सोहळा संपन्न...!


💥उत्कृष्ट नियोजनबद्दल किरण गित्तेच्या हस्ते प्रदीप खाडे यांचा सत्कार💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या वतीने स्व.दिनकरराव गित्ते यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर विशेष शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे चोख व उत्कृष्ट असे नियोजन केल्याबद्दल  नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे व सहकार्य यांचा त्रिपुरा राज्याचे बांधकाम आणि नगरविकास सचिव किरण गित्ते व विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

परळी येथील स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिर येथे स्व.दिनकरराव गित्ते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्यावतीने विशेष शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील विशेष करून भारतीय प्रशासकीय सेवेतील मान्यवरांनी नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर मौल्यवान मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्रिपुरा राज्याचे बांधकाम आणि नगरविकास सचिव किरण गित्ते, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, साप्ताहिक जडण - घडणचे संपादक डॉ.सागर देशपांडे, परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य व्यवस्थापक मोहन आव्हाड, आदी मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर परळी परिसरातील सुमारे १२० आदर्श शिक्षक, शिक्षणप्रेमी पालक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या वतीने स्व.दिनकरराव गित्ते यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर परळी-वैजनाथ येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाचे  आदर्श शिक्षक, शिक्षणप्रेमी पालक, गुणवंत विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया ते बैठक व्यवस्था, स्टेज, मान्यवर व सर्व बाबीचे चोखपणे व उत्कृष्ट असे व कौतुकास्पद नियोजन  नाथ शिक्षण सं स्थेचे सहसचिव प्रदीप खाडे व सहकार्यानी केले होते. त्याबद्दल नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांचा त्रिपुरा राज्याचे बांधकाम आणि नगरविकास सचिव किरण गित्ते व विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश नाना फड, अजय जोशी ,अतुल दुबे ,संजय कराड ,अंकुश फड, प्रा. सुनील चव्हाण, विठ्ठल तुपे सर बालाजी दहिफळे रवी कराड, महेश मुंडे, बाळासाहेब फड, आधळे आदी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या