💥किरण गित्ते यांच्या नागरी सत्कार व कौतुक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - सुरेश (नाना) फड,प्रदीप खाडे


💥बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मा.श्री.किरण गित्ते (आयएएस) यांचा उद्या 23 आक्टोंबर रोजी नागरी सत्कार💥 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत संपूर्ण देशात त्रिपुरा राज्याने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच शहरी आवास योजनेतील उत्कृष्ट कार्याबद्दल मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्रिपुरा सरकार मधील सार्वजनिक बांधकाम, नगर विकास, पर्यटन विभागाचे सचिव तथा बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मा. श्री. किरण गित्ते IAS यांचा नागरी सत्कार व कौतुक सोहळ्याचे आयोजन दिनांक 23 ऑक्टोबर 2022 रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिर येथे सायंकाळी 4 वाजता करण्यात आले आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुरेश (नाना) फड, प्रदीप खाडे व नागरी सत्कार समिती परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या नागरी सत्कार व कौतुक कौतुक सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून  माजी मंत्री श्री.धनंजयजी मुंडे साहेब,बीड -लातूर -उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ. सुरेशजी धस,   ,भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा. टी. पी.मुंडे सर, माजी विधान परिषद सदस्य संजय दौंड,तर कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष डॉ. राजारामजी मुंडे, रघुनाथजी खेत्रे सेवानिवृत्त मुख्याध्यापक - जि.प. शाळा आधी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. दिनांक 23 ऑक्टोबर रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे येथे होणाऱ्या या भव्य नागरी सत्कार व कौतुक सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुरेश (नाना) फड, प्रदीप खाडे व नागरी सत्कार समिती परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या