💥पुर्णेतील 'शिवतिर्थावर' असंख्य दिवे लावून शिवप्रेमींनी केला दिपोत्सव...!


💥स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या अगणित मावळ्यांचे स्मरण करण्यासाठी दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिपोत्सवाचे आयोजन💥


पुर्णा (दि.२२ आक्टोंबर) - शहरातील शिवतिर्थावर आज शनिवार दि.२२ आक्टोंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच स्वराज्यासाठी बलिदान देणारे अगणित मावळे यांचे स्मरण करण्यासाठी स्वराज्य मित्र मंडळाचे संस्थापक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रताप कदम युवा नेते इरशाद उर्फ इश्श्यू पठाण,शिवभक्त सोनाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवप्रेमी युवकांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिपोत्सव साजरा करण्यात आला.


यावेळी शिवप्रेमींनी महाराष्ट्राचे आराद्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा गगनभेदी जयघोष केला यावेळी शिवतिर्थावर असंख्य दिवे लावण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या