💥परभणी जिल्ह्यात शिवसेना खा.संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर...!


💥जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन : शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी💥


परभणी (दि.१९ आक्टोंबर) - परभणी जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन/कापूस आदी खरीपातील हाता तोंडाला आलेल्या पिकांसह फळ बागायत/भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकऱ्यांवर ऐन दिपावली सनाच्या तोंडावर अक्षरशः अश्रू ढाळण्याची वेळ आली परंतु या अत्यंत दुर्दैवी परिस्थितीत देखील प्रशासन निद्रिस्त परिस्थितीत असल्यामुळे या झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी जिल्ह्यात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) खा.संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व


शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज बुधवार दि.१९ आक्टोंबर २०२२ रोजी रस्त्यावर उतरून जिल्ह्यात सर्वत्र रास्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून त्यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच शेतकऱ्यांना पिकविम्याचा परतावा मिळावा यासाठी शिवसेना-युवासेने तर्फे जिल्ह्यात सर्वत्र परभणी जिल्ह्याचे खासदार मा.संजयजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले या पार्श्वभूमीवर पालम येथे शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कटदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य शेतकरी मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पालम शिवसेना तालुकाप्रमुख हनुमंतराव पौळ, युवासेना तालुकाप्रमुख ओंकार सिरस्कर यांच्यासह असंख्य शिवसेना व युवासेना कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

💥पुर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेनेचा रास्तारोको :-


पुर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथे शिवसेना  (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख तथा मा. जिल्हा परिषद शिक्षण सभापती गंगाप्रसाद आनेराव,पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बि.आर.देसाई, उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले व शिवसेना तालुका प्रमुख काशिनाथ काळबांडे नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांच्या न्यायिक हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या शिवसेनेकडून तहसिलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात पुर्णा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्याची मागणी करण्यात आली या आंदोलनावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा शिवसेना नेते संतोष एकलारे,युवा सेना माजी उपजिल्हाधिकारी माणिकराव सुर्यवंशी पाटील पुर्णा शिवसेना शहरप्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम,युवा सेना उपजिल्हाधिकारी विशाल भोसले,युवा सेना तालुकाधिकारी बंडुआप्पा बनसोडे,युवा सेना शहराधिकारी विकास वैजवाडे,उपसभापती माणिक काळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या