💥एनसीसीधारक उमेदवारांचे बोनस गुणाचा जी.आर रद्द करावा मागणी आंदोलनास विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिली भेट...!


💥एनसीसीचा शासन निर्णय बंद करा मागणीचे निवेदन स्विकारले💥

औरंगाबाद / संभाजीनगर 

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) धारक उमेदवारांचे बोनस गुणाचा जीआर रद्द करावा या मागणीसाठी आज पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांने केलेल्या टि व्ही सेंटर येथील आंदोलन पुकारले होते, या आंदोलनास राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली. पोलीस भरती उमेदवाराशी संवाद साधून उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले,यावेळी उमेदवार विद्यार्थ्यांकडून एनसीसीच्या बोनस गुण बाबतचा शासन निर्णय बंदच्या मागणीचे निवेदन देण्यात ना.दानवे यांना देण्यात आले.


यावेळी बोलताना ना.दानवे यांनी विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही,

एनसीसी प्रमाणपत्र धारण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने अ, ब, क, या तीन गटात विभागून त्यांना भरती प्रक्रियेतील एकूण गुणांच्या ३,५,७ से  मार्क देण्याचा निर्णय घेतला आहे,

त्यामध्ये किती महाविद्यालयात एनसीसी सुरु आहे,किंवा महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयात एनसीसी सुरु करावेत ,एनसीसीच्या विद्यार्थ्यांने पोलीस भरतीत यावे हे खरे आहे, सरकारने सर्व महाविद्यालयात एनसीसी प्रामुख्याने सुरु करावे सरकारने एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मार्क्स द्यावे परंतु दुसऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी,आम्ही तुमच्या आंदोलनात सहभागी आहोत सरकारला यावर निर्णय घेण्यास भाग पाडू असा विश्वास दाखविला.

यावेळी शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, सचिन तायडे, ज्ञानेश्वर शेळके, समाधान खांडवे, अर्जून पाटील, शंकर व्यवहारे, छत्रपती रन्हेर ,राहुल शिंदे, विष्णू मगर, आकाश पडघण,गजानन कांबळे, शंकर मगर, अमोल गोरे, अमोल तांगडे, प्रदीप महालकर, प्रद्युम्न राजळे, कृष्णा गोमासे,गोविंद मुंडे, हनुमान पाईकराव, समाधान नागरे, श्याम काकडे आदी ग्रामीण व शहरी भागातील पोलीस भरती करणारे हजारो विद्यार्थी उपस्थित होते.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या