💥पुर्णा तालुक्यातील खांबेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध...!


💥शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भिवाजी राऊत तर उपाध्यक्षपदी दशरथ घायाळ यांची निवड💥

ताडकळस / प्रतिनिधी

पुर्णा (दि.07 आक्टोंबर) तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेल्या खांबेगाव   समितीच्या अध्यक्षपदी भिवाजी राऊत तर उपाध्यक्षपदी दशरथ घायाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. खांबेगाव येथे दि. ६ ऑक्टोबर २०२२ वार गुरूवार रोजी  पालक सभा घेण्यात आली यात सर्वानुमते येथील शिक्षणप्रेमी युवा कार्यकर्ते अध्यक्षपदी भिवाजी राऊत तर उपाध्यक्षपदी दशरथ घायाळ निवड करण्यात आली. तर सचिव गजानन तांबे  समितीचे सदस्य म्हणुन सारीका शेंगुळे, मालनवी पठाण, गंगासागर माने, स्वाती आवरगंड, सविता घड्याळ, लक्ष्मण खंदारे, सरवत श्रंगापुतळे, बापू श्रंगळापुतळे  आदीची निवड करण्यात आली.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पालक सभा संपन्न झाली. या निवडीबद्दल सरपंच मुक्ताबाई कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गजानन कदम, गावचे पोलीस पाटील माधवराव दुधाटे, सामाजिक कार्यकर्ते भगवान राऊत, शंकर शिंदे, पिराजी हजारे आदींनी नुतन पदाधिकाऱ्यांचे आभिनंदन केले. शाळेचे मुख्याध्यापक वाडेकर सर दिलीप सर ज्योती दूधुळे सीमा गरदसवार आदीसह शिक्षणप्रेमी युवकांनी पुढाकार घेतला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या