💥औरंगाबाद ग्रामीन हद्दीत गाडेजळगाव शिवारात धावत्या रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यू....!

 💥सदर अनोळखी इसम कोणाच्याही ओळखीचा असल्यास पोलीस स्टेशन करमाड येथे संपर्क करावा💥

औरंगाबाद (दि.१५ आक्टोंबर) - औरंगाबाद ग्रामीण मधील करमाड पोलीस स्थानकाच्या हद्दीतील गाडेजळगाव शिवारात पडूळ वस्ती येथे रेल्वे पटरीच्या बाजूला एका अनोळखी इसमाचा अंदाजे ३५-४० वर्ष वयोगटातील अंगात फूल बाह्याचा जांभळ्या रंगाचा शर्ट,निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट, निळ्या रंगाची बनियान, कमरेला काळ्या रंगाचा बेल्ट गळ्यात केसरी रंगाचा धागा, मजबूत बांधा,उंची -०५ फूट ६ इंच , चेहरा गोल नाक आखूड (कमी लांबीचे) तोंड चपटे रंग - गोरा,सदर इसम हा रेल्वेमधून पडून जखमी होऊन मरण पावला आहे. 

सदर इसमाचे कपाळावर तोंडावर हनवटीचे ठिकाणी व तळहातावर मार लागलेल्या जखमा दिसत आहेत. सदर इसमास औरंगाबाद येथे घाटी दवाखान्यात दाखल करण्यात आलेले आहे.तरी सदर अनोळखी इसम कोणाच्याही ओळखीचा असल्यास पोलीस स्टेशन करमाड येथे संपर्क करावा असे आवाहन रेल्वे प्रवासी सेनेकडून करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या