💥....अरे आम्ही पत्रकारांनी तुमच्यासाठी वर्षभर राबराब राबायच प्रत्येकाचा विरोध पत्करून सतत दबावात का जगायच ?


💥अन् शेवटी प्रत्येकाने आम्हाला 'त्या पत्रकाराच काय खर हाय' म्हणून त्याच्याकडे तुच्छ नजरेनंच बघायच..?💥

अरे आम्ही पत्रकारांनी तुमच्यासाठी वर्षभर राबराब राबायच प्रत्येकाचा विरोध पत्करून सतत दबावातच का जगायच ? सामाजिक बांधिलकी जोपासत जनसामान्यांच्या मुलभूत नागरी असुविधांकडे वेळोवेळी परखड लिखाण करून निष्क्रिय प्रशासनासह अकार्यक्षम लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधायच अन् शेवटी प्रत्येकाने आम्हाला त्या पत्रकाराच काय खर हाय म्हणून त्याच्याकडे तुच्छ नजरेनंच बघायच..?

अरे कुठेही न्याय मिळाला नाही की अन्यायग्रस्त बनून शेवटी शेवटचा पर्याय म्हणून तुम्हीच न्याय पदरात पाडून घेण्यासाठी तुमच्यासह प्रत्येकाच्या नजरेत पडलेल्या त्या तुच्छ पत्रकाराच घर मग काय म्हणून शोधायच ?

धार्मिक सलोखा/राष्ट्रीय/सामाजिक एकात्मता असो की नैसर्गिक आपत्ती त्या पत्रकाराने प्रत्येक राष्ट्रीय कार्यात स्वतःला झोकायच अन् त्याने जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी वास्तविक सत्यता दर्शवणार लिखाण केल की कोणीही भ्रष्ट बेईमान समाजकंठक गुंड अन् समाजात अराजकता माजवणाऱ्या राजकीय षंढ दलालाण त्याला ठोकठोक ठोकायच ?

आम्ही पत्रकारांनी तुमच्यासाठी वर्षभर राबराब राबायच प्रत्येकाचा विरोध पत्करून सतत दबावात जगायच ? अरे वर्षभर कागदाला प्रत्येकाच्या न्याय हक्कांच्या संरक्षणासाठी ढाल अन् लेखणीला तलवार बनवून आम्ही पत्रकारांनी निस्वार्थपणे स्वतःसह स्वतःचे कुटुंब असुरक्षित करून लढायच अन् वर्तमान पत्राचा चाखर बनून वर्तमानपत्राच्या हितासाठी दिपावली सन उत्सव काळात तुम्हाला जाहीरात देण्याची विनंती केली की तुमच्या दृष्ट नजरेत आम्ही पडायच ? 

बिन पगारी फुल अधिकारी बनून आम्ही पत्रकारांनी गल्लीतल्या फाटक्यापासून दिल्लीतल्या बाडग्यासह प्रशासनातील भ्रष्ट बेईमान जनसामान्यांचे सोशन करणाऱ्या रक्तसोशकांच सातत्याने मोठपण करायच अन् शेवटी स्वतःच्या बदणामीचे गाठोड स्वतःच्या झोक्यावर धरून त्यांच्या मागपुढ कुठवर रे नालायकांनो फिरायच ? 

अरे कतृत्वशुन्यांनों आमच्या मेहेरबानीने बातमीत नाव आल की उगाच फार मोठ कर्तृत्व गाजवल्या प्रमाणे बेडकावानी फुगायच अन् बातमीत पत्रकार नाव टाकायला विसरला की त्याच्याशी शत्रूत्व करायच अन् त्याच्या मार्गावर काट्यांच कुंपण धरायच ? अरे मग आम्ही पत्रकारांनी तुमच्यासाठी वर्षभर राबराब राबायच प्रत्येकाचा विरोध पत्करून सतत दबावातच का जगायच ? 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या