💥परळी तालुक्यातील निराधारांसाठी सव्वासात कोटी मंजुर....!


💥निरांधारांना पगाराचे दिवाळीअगोदर होणार वाटप - तहसिलदार सुरेश शेजुळ

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- परळी तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृतीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेतील परळी तालुक्यातील एकुण 21646 लाभार्थांना 7 कोटी 25 लाख 37 हजार 200 रुपये एवढे अनुदान मंजुर झाले असुन सदरील अनुदान बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहे.येत्या दोन दिवसात हे अनुदान लाभार्थ्यांना वाटप होणार असल्याची माहिती तहसिलदार सुरेश शेजुळ यांनी दिली.

  परळी तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे 5013 लाभार्थी आहेत त्यांना प्रत्येकी 3000 रुपये अनुदान मंजुर झाले आहे.श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे 12282 लाभार्थी असुन प्रत्येकी 3000 रुपये अनुदान मंजुर झाले आहे.दि.27 डिसेंबर 2021 रोजीच्या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेतील 439 लाभार्थींना प्रत्येकी 9000 रुपये तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत मंजुर झालेल्या 1023 लाभार्थ्यांना प्रत्येकी 9000 रुपये असे एकूण 21646 लाभार्थ्यांना 7,25,37,200 रुपये एवढे अनुदान मंजुर झाले आहे सदरील अनुदान महाराष्ट्र ग्रामीण बॅंक परळी,मोहा,सिरसाळा,धर्मापुरी,पोहनेर,घाटनांदुर,महाराष्ट्र बॅंक परळी,थर्मल,एसबीआय परळी दोन्ही शाखा,नागापुर,घाटनांदुर या बॅंकेसह पोष्ट ऑफिस परळी,पांगरी,मुख्य पोष्ट ऑफिस बीड यांच्याकडे जमा झाले असल्याची माहिती परळीचे तहसिलदार सुरेश शेजुळ यांनी दिली. सदरील अनुदान लाभार्थ्यांना  दिवाळी अगोदर येत्या दोन दिवसात वाटप करावे अशा सक्त सुचना तहसिलदारांनी दिल्या आहेत.यामुळे परळी तालुक्यातील निराधारांची दिवाळी गोड होणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या