💥दिवाळी सना निमित्त शिधा जिन्नस संचाचा लाभ घ्या - जिल्हाधिकारी आंचल गोयल


💥सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणार अल्पदरात शिधा जिन्नस संच💥 

परभणी (दि.११ आक्टोंबर) :  सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना दिवाळी निमित्त 4 शिधा जिन्नासांचा समावेश असलेल्या शिधा जिन्नस संचचा लाभ घेण्यासाठी पात्र शिधापत्रिकाधारकाने त्यांचे तालूक्याचे संबंधीत स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडे शासन नियमानुसार देय रक्कम भरुन शिधा जिन्नस संच हस्तगत करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

                    नियमित धान्य मोफत धान्य या व्यतिरिक्त हे अतिरिक्त पॅकेज अतिशय स्वस्त दरात मिळणार आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी आवश्यक शिधा जिन्नस संचाची मागणी पुरवठा विभागातर्फे संबंधीत कंत्राटदारांकडे नोंदविली आहे. तालुका गोदामांपर्यंत संच पोहोचविण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असणार आहे. विशेष म्हणजे एफएसएसआय मानंकाची पुर्तता करत असल्याचे एनएबीलएल अधिस्वीकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र कंत्राटदाराकडून प्राप्त केल्यानंतर शिधा जिन्नस संच स्वीकारवेत अशा शासनाच्या सूचना आहेत.

                 राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब व तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्या व्यतिरिक्त प्रत्येकी 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधा जिन्नसाचा समावेश असलेला शिधा जिन्नस संच उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 4 ऑक्टोबर, 2022 च्या शासन निर्णयानुसार घेतला आहे. तरी लाभार्थ्यांनी दिवाळीनिमित्त शिधा जिन्नस संचाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या