💥तेलंगनातील वारंगळ मध्ये टिआरएस नेत्याचा प्रताप दारुसह कोंबडी वाटप सुरु......!


💥तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते राजनाला श्रीहरी यांनी वारंगळ मध्ये स्थानिकांना दारूच्या बाटल्या आणि कोंबड्यांचे केले वाटप💥

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव त्यांच्या राष्ट्रीय पक्षाच्या नावाची घोषणा करणार आहेत यासंबंधी सर्व तयारी पूर्ण देखील झालेली आहे के.सी.आर.राष्ट्रीय राजकारणात पाऊल टाकत असतानाच टी.आर.एस.च्या एका नेत्याचा खळबळजनक व्हि.डि.ओ. समोर आला आहे नव्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा होण्यापूर्वीच तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते राजनाला श्रीहरी यांनी वारंगळ मध्ये स्थानिकांना दारूच्या बाटल्या आणि कोंबड्यांचे वाटप केलं राजनाला श्रीहरी यांचा व्हि.डि.ओ. सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे राजनाला श्रीहरी यांचा हा व्हि.डि.ओ. वृत्तसंस्था ए.एन.आय.नं देखील ट्विट केला आहे.

* सोशल मिडियावर पसरलेल्या व्हिडिओत काय ? :-

राजनाला श्रीहरी एका ट्रक जवळ उभे राहिलेले दिसून येतात त्यांच्या समोर एका ठिकाणी कोंबड्या आणि दारुच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या एक जिवंत कोंबडी आणि एक दारूची बाटली ते स्थानिकांना देताना त्या व्हि.डि.ओ.त दिसून येतात दारूच्या बाटल्या आणि कोंबड्या स्वीकारण्यासाठी स्थानिकांची मोठी रांग देखील दिसून येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या