💥संस्थाचालक गटातून प्रोफेसर डॉ.रामेश्वर पवार अधिसभेवर विजयी...!


💥या निवडणूकीत १२१ मतदारांपैकी ११६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता त्यापैकी ०८ मते बाद झाली💥

पूर्णा (दि.१२ आक्टोंबर) - अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ,परभणी संचलित येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाचे संस्थापक सचिव प्रोफेसर डॉ.रामेश्वर पवार यांचा विजय झाला आहे. नुकत्याच झालेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या निवडणुकीत अधिसभा निवडीसाठी ११ ऑक्टोबर मंगळवार रोजी मतमोजणी  झाली. यात महाविद्यालयीन संस्थाचालकाच्या गटातून एक नंबरची मते घेऊन दणदणीत विजय झाला.

संस्थाचालक गटातून नरेंद्र चव्हाण, कुसुम पवार,नवनाथ चव्हाण,धनराज जोशी आदी विजयी झाले आहेत.या निवडणूकीत शिक्षण संस्थाचालक गटातील आठ मतदारांना आपला हक्क बजावता आला नाही.१२१ मतदारांपैकी ११६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता त्यापैकी ०८ मते बाद झाली. 

प्रोफेसर डॉ.रामेश्वर पवार यांच्या विजयाबद्दल अनुसया शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव कदम तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी,सदस्य व श्री.गुरुबुध्दी स्वामी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष राजुअण्णा एकलारे ,सचिव अमृत कदम, कोषाध्यक्ष उत्तमराव कदम, सहसचिव प्रा.गोविंदराव कदम प्राचार्य डॉ.के. राजकुमार तसेच विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध संस्थांचे संचालक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आदींनीही त्यांचे अभिनंदन केले असून सत्कार करण्यात आला याप्रसंगी श्री.गुरुबुध्दी स्वामी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष उत्तमराव कदम, व्यंकट कदम व महाविद्यालयीन प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या