💥पुर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथील अल्पभुधारक शेतकरी संतोष भारती यांचे सोयाबीन पावसाच्या पाण्यात वाहून गेले...!


💥सरकार ने तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी आर्त हाक शेतकरी करत आहे💥पुर्णा (दि.१४ आक्टोंबर) - तालुक्यात आज शुक्रवार दि.१४ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसामुळे तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नद्यांच्या काठावरील तसेच ओढे नाल्यांच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे काढलेले सोयाबीन वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेल्यामुळे शेतकऱ्यांवर अक्षरशः अश्रू ढाळण्याची वेळ आली असून तालुक्यातील मौ.कंठेश्वर येथील अल्पभुधारक शेतकरी संतोष भारती यांच्या शेतातील कापून ठेवसेल्या सोयाबीनची वळई अक्षरशः ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे त्यांचे  मोठे नुकसान झाले आहे.


कंठेश्र्वर येथील शिवारात पावसाच्या पाण्याने शेतकरी भारती यांच्या शेतातील सोयाबीन अक्षरशः वाहून गेल्याचे दिसून येत आहे.सदरील संकट हे या भागातील अनेक शेतकऱ्यांवर ओढवले आहे.तरी सरकार ने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी असे आर्त हाक शेतकरी करत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या