💥काळानुसार उच्च शिक्षणातून नोकरीची संधी शोधली पाहिजे - नरेंद्र चव्हाण


💥स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालयात आयोजित वर्तमानातील उच्च शिक्षण आणि नोकरीची संधी व्याख्यानमालेत ते बोलत होते💥


पूर्णा (दि.१९ आक्टोंबर) प्रतिनिधी- आजच्या वर्तमान स्थितीत उच्चशिक्षणामधून नोकरीची संधी शोधण्याची कला अवगत करणे ही काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य नरेंद्र चव्हाण यांनी केले. ते येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील करिअर गायडन्स सेल अंतर्गत वर्तमानातील उच्च शिक्षण आणि नोकरीची संधी या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी  प्रमुख व्याख्याते म्हणून चव्हाण बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक सचिव तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रोफेसर डॉ.रामेश्वर पवार,श्री गुरु बुध्दी स्वामी शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा.गोविंद कदम, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे,माहिती व हमी कक्षाचे समन्वयक डॉ.भीमराव मानकरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की,वर्तमानात उच्च शिक्षण घेऊन नोकरीची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत पण त्या उद्योग क्षेत्रात. सरकारी नोकरीचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग लघुउद्योग व सहकारातून उत्पन्नाचे नवे स्त्रोत उभे करण्यासाठी झाला पाहिजे.  कोणत्याही  व्यवसायामध्ये परिश्रम,सातत्य व निष्ठा यासोबतच भांडवल या बाबी महत्त्वाच्या असतात म्हणून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी सहकारातून व बँकेकडून छोटे-मोठे कर्ज घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिलो तरच आपले भविष्य घडविण्यात यशस्वी होऊ असेही त्यांनी यावेळी आपल्या व्याख्यानात सांगितले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संस्थेच्या गटातून सर्वाधिक मते घेऊन नरेंद्र चव्हाण हे विजयी झाल्याबद्दल त्यांचा अनुसया शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संस्थेचे संस्थापक सचिव प्रोफेसर डॉ. रामेश्वर पवार यांनी सत्कार केला.  कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक सचिव प्रोफेसर डॉ. रामेश्वर पवार हे होते.  कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष कुऱ्हे यांनी मांडले.सूत्रसंचालन प्रा.डॉ.पी.के. किर्तनकार यांनी केले तर आभार पी.डी.सूर्यवंशी यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा व्याख्यानाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करियर गाईड सेलचे समन्वयक डॉ. विजय भोपाळे, डॉ. संजय कसाब, डॉ. प्रभाकर कीर्तनकार यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या