💥पुर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु....!


💥आज दुपारी 01-30 सुमारास पाच दरवाजे 0.30 मीटरने उघडून एकूण 5826.15 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु💥

परभणी (दि.07 आक्टोंबर) : पूर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्पातून आज शुक्रवार दि.07 आक्टोंबर 2022 रोजी दुपारी 01-30 वाजेच्या सुमारास 5 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.

                  बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथील या प्रकल्पात 95.96 टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. 89.6280 दशलक्ष घनमीटर जिवंत साठा तर 520.37 मीटर जलाशयातील पाणी पातळी असून या पार्श्‍वभूमीवरच खडकपूर्णा प्रकल्पाच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास पाच दरवाजे 0.30 मीटरने उघडून एकूण 5826.15 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु केला आहे.

दरम्यान, पूर्णा नदीच्या काठावरील गावच्या ग्रामस्थांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे खात्याने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या