💥पुर्णा तालुक्यातील माखणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती बिनविरोध...!


💥शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शिवाजी आवरगंड तर उपाध्यक्षपदी बंडु गाडे याची निवड💥

पुर्णा (दि.07 आक्टोंबर) - तालुक्यातील ताडकळस येथुन जवळच आसलेल्या माखणी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या शाळा व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षपदी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे ताडकळस सर्कलचे अध्यक्ष शिवाजी प्रल्हादराव आवरगंड यांची तर उपाध्यक्षपदी वचिंत बहुजन आघाडीचे सर्कल प्रमुख बंडु गाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.


माखणी येथिल शाळेय व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी निवड करण्यासाठी आज दि.७/१०/२०२२ वार  सुक्रवार रोजी पालकांची बैठक घेण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी शिवाजी आवरगंड तर उपाध्यक्षपदी बंडु हरिभाऊ गाडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली असुन सदस्य पदी राजेश शिवाजी आवरगंड, कल्याण रंगनाथराव आवरगंड, अश्विनी गोविंद पल्लमपल्ली, सारिका संतोष अंभोरे,सुरेखा सुग्रीव भुजबळ, अनुरथ बालासाहेब आवरगंड, आनंदा केरबा आवरगंड, मिनाताई नागनाथ नवघरे, उद्धव बळीराम आवरगंड, धोंडीराम जानकीराम पल्लमपल्ली, राधा रामकिसन काळे आदींची निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती बिनविरोध निवडीसाठी सरपंच गोविंद आवरगंड, माजी चेअरमन संजयकुमार आवरगंड, ग्रामरोजगार तालुकाध्यक्ष यशवंत गाडे,शिवाजी गाडे, भिमराव वाघमारे,आवरगंड, शिवाजी  आवरगड, मंचकराव आवरगंड, नेमाजी गाडे, व्यंकटराव पल्लमपल्ली, नवनाथ आवरगंड, विष्णू आवरगंड आदीसह पालकांनी पुढाकार घेतला. शाळा व्यवस्थापन समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक व सरपंच यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संजयकुमार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक गजानन पवार, राम महाजन, सुरज पौळ,राजकुमार ढगे, ज्योती झटे,  सुनिल शेळके यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या