💥पुर्णा येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी अनुदानापासून वंचित : उपोषणाचा अवलंबला मार्ग...!


💥राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रताप कदम यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता💥


पुर्णा (दि.१० आक्टोंबर) - पुर्णा शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मागील चार ते पाच वर्षापासून अनुदानापासून वंचित ठेवण्याचे पाप नगर परिषद प्रशासनाकडून होत असल्यामुळे अनुदानापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना शेवटी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला मागील सन २०१७ यावर्षी मंजूर झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षाच्या काळात अनुदानाचे हप्ते मिळाले नाही.


या योजनेतील म्हणून गिरीराम नागोराव सोळंके, पाराजी तुळशीराम घोरपडे, वच्छलाबाई विठ्ठलराव मेघमाळे, सुदाम दत्तराव जगताप, विश्वनाथ बापुराव
लोंढे, राजकुमार पिराजी भंगे आदी लाभार्थी नगर परिषद समोर आज सोमवार दि.१० आक्टोंबर २०२२ रोजी उपोषणास बसले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रताप कदम यांना ही माहिती समजताच त्यांनी उपोषण स्थळी भेट दिली शहराध्यक्ष प्रताप कदम यांच्या मध्यस्थीने उपोषण उठवण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष बाबा पठान.माजी नगरसेवक अमजद साहब नूरी आदींची उपस्थिती होती  यावेळी नगर परिषद प्रशासनाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रताप कदम यांच्या समक्ष उपोषणार्थींना सांगण्यात आले की येत्या १५ दिवसाच्या आत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना निधी वाटप करण्यात येईल.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या