💥इंटरनॅशनल अचीवर ऑफ़ द ईयर 2022 पुरस्कार फेरोज मणियार यांना प्रदान....!


💥नांदेड जिल्ह्याचे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा नगरपरिषदेत फेरोज मणियार यांचा सत्कार केला💥


लोहा प्रतिनिधी

लोहा (दि.०६ आक्टोंबर) - शक्ति फ़िल्म प्रोडक्शन च्या वतीने बनींपार्क स्थित होटल सुविनियर पीपरमेंट जयपुर मध्ये इंटरनेशनल अचीवर ऑफ़ द ईयर पुरस्काराचे भव्य आयोजन करण्यात आले होते.यात देशभरातील की ५१ प्रतिभावंताचा सम्मान करण्यात आला यामध्ये दैनिक जनतेचे मत माझे मत चे संपादक जनतेचे मत युट्युब न्यूज चॅनेल चे संचालक फेरोज मणियार यांना हा बहुमान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा नगरपरिषद येथे फेरोज मणियार यांचा शालपुष्पहार घालून सत्कार केला याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता ताई देवरे चिखलीकर, लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, लोहा नगरपरिषदेचे सत्तारूढ पक्षाचे सभागृहाचे नेते करीम भाई शेख, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, नगरसेवक नबीसाब शेख नगरसेवक प्रतिनिधी केतन खिल्लारे, नगरसेवक येवले, सेवानिवृत्त शिक्षक कदम सर, गोलेगाव चे सरपंच केरबा केंद्रे, युवा नेते बंडू पाटील वडजे, बाळू पाटील कदम, दिनेश मोटे, आर आर पाटील पारडीकर, पंडित पाटील फासगे, आदी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या