💥समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने 200 गरजू व्यक्तींना दीपावली निमित्त फराळ वाटप.....!


💥यावेळी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 


परभणी :- शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दीपावली निमित्त समाजातील दुर्लक्षित, वंचित घटक, गोर, गरीब, गरजू, निराधार, भिक्षावृत्ती करणारे, मानसिक रोगी, आदींना शहर भर फिरून 200 व्यक्तींना फराळ वाटप करून दीपावली साजरी करण्यात आली. या वेळी फराळ वाटपाची सुरुवात समाजहित अभियान प्रतिष्ठान मुख्य कार्यालय डॉ. आंबेडकर नगर, आय. टी. आय. कॉर्नर जिंतूर रोड परभणी येथून केली, पुढे रींतुर रोड मार्गे जुना जिल्हा परिषद परिसर, उडान पूल परिसर, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, भारतरत्न डॉ. आंबेडकर पूर्णा कृती स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर, स्टेडियम, क्रांतीसुर्य महात्मा फुले स्मारक, शाही मस्जिद परिसर, गांधी पार्क मार्ग, शिवाजी चौक व सुभाष रोड मार्गे जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे फराळ वाटप उपक्रमाचा समारोप करण्यात आला. 

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, उपाध्यक्ष आकाश साखरे, राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, दीपक बनसोडे, शंकर बनसोडे, किरण मोरे, बाळूभाऊ घिके, श्रेयस अंभोरे, अजय अंभोरे, तेजस हिवाळे, विलास नवगीरे,  अजय शिराळे, आकाश राक्षे, विकास जमधाडे, अजय नंदपटेल, प्रकाश अंभोरे, राहुल घोंगडे, प्रेम तूपसमुंद्रे, संदीप वायवळ, सिद्धार्थ मुजमुले, राहुल धबाले, राजू कर्डिले, बालाजी कांबळे, सय्यद जमील, रियाझ खुरेशी, मिलिंद मस्के, अब्दुल रहमान खान, विनोद वाडेकर, शुभम कोरडे, राजू खरात, विजय पवार, रमाताई घोंगडे, सरीताताई अंभोरे, रेखाताई कांबळे, मीनाताई शिरसे, वंदनाताई सोनवणे, वंदनाताई खिल्लारे, सुशिलाताई ठोके आदींनी विशेष परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या