💥राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र 140 पदकासह प्रथम......!


💥मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टिव्टद्वारे केले सर्व खेळाडूंचे अभिनंदन💥

परभणी (दि.13 आक्टोंबर) : गुजरात येथे आयोजित 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तब्बल 140 पदक प्राप्त केल्याने महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर राहिला आहे. ‘महाराष्ट्र आणि जय महाराष्ट्र’ ही थीम ही खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात सार्थ ठरली आहे.

या स्पर्धेतील पदक तालिकेत महाराष्ट्राच्या संघाने दुसरे स्थान मिळवले आहे. या यशामध्ये खेळाडूंच्या कठोर परिश्रमबरोबरच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचाही मोलाचा वाटा आहे. तब्बल 7 वर्षांच्या खंडानंतर गुजरात राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी केरळ येथे 2015 मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाली होती. गुजरात राज्यात अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, बडोदा, राजकोट, भावनगर अशा 6 ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 36 क्रीडा प्रकारांत तब्बल 7 हजार खेळाडूंनी आपले कौशल्य सादर करुन सर्वांचींच मने जिंकली यात खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या खेळाडूंचे यश अधोरेखीत झाले आहे. पदक तालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या सर्व्हिसेस आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या हरियाणा यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 140 पदकांची कमाई करुन ही स्पर्धा गाजवली. आधुनिक सुविधा, खेळाडूंसाठी असलेले विविध सुविधा आणि ऑलिम्पिकपटू, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या सर्व्हिसेस आणि हरियाणाच्या खेळाडूंच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या हौशी खेळाडूंनी दाखवलेले कौशल्य आणि मिळवलेले घवघवीत यश हे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पदक तालिकेत महाराष्ट्र संघ दुसऱ्या स्थानावर असला तरी महाराष्ट्राने सर्वाधिक 140 पदकांची कमाई करुन आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यातील जवळपास सर्वच क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदके जिंकली आहेत हे विशेष. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गुजरात राज्यात होणार अशी घोषणा होताच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश असलेल्या क्रीडा प्रकारांच्या संघटनांशी संपर्क साधून खेळाडूंच्या तयारीचे योग्य नियोजन केले होते. सराव शिबिरांचे नियोजन देखील अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आले होते. सर्वच क्रीडा प्रकारांच्या सराव शिबिरात तज्ज्ञ व अनुभवी प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले होते. सराव शिबिरांचे नियोजन करण्याबरोबरच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी साडेचार कोटी रुपयांची तरतूद करुन घेतली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या खेळाडू विमानाने स्पर्धेच्या ठिकाणी पोहचले आणि पुन्हा विमानाने महाराष्ट्रात दाखल झाले हे विशेष. एका स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंना विमान प्रवासाचा लाभ होण्याची ही पहिलीच घटना आहे. खेळाडूंना प्रवासात कोणताही त्रास होऊ नये यासाठी विमानाने पाठवण्याची व्यवस्था व्हावी यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. यात महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांचा मोलाचा वाटा आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या अफलातून कामगिरीने गाजवली असली तरी मैदाना बाहेरच्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासन, क्रीडा मंत्री गिरीश महाजन, क्रीडा विभागाचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे व वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी केलेले नियोजन हे देखील तेवढेच निर्णायक ठरले आहे. स्पर्धेच्या ठिकाणी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी व क्रीडा खात्याचे अधिकारी यांनी खेळाडूंचे मनोबल वाढविण्याचे काम केले आहे. राज्य शासन, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, राज्याचा क्रीडा विभाग, खेळाडू, प्रशिक्षक, संघटनांचे पदाधिकारी यांची एकत्रित सांघिक कामगिरी उत्कृष्ट ठरल्यानेच महाराष्ट्राने सर्वाधिक पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका वाजवत भगवा झेंडा मोठ्या दिमाखाने फडकवला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील टिव्टद्वारे स्पर्धेत सहभागी महाराष्ट्राच्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. 'टीम महाराष्ट्र आणि जय महाराष्ट्र ही थीम' ही खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात सार्थ ठरली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या