💥महाराष्ट्र स्टार्टअप अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे 13 ऑक्टोबर रोजी आयोजन....!


💥नवउद्योजक होवू इच्छिणाऱ्यांनी सादरीकरणासाठी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोगल यांनी केले💥 

परभणी (दि.11 आक्टोंबर) : नाविन्यपूर्ण आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार  उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा आयोजित करण्यात येत असून याअंतर्गतचा दुसरा टप्पा  जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर सादरीकरण सत्र दि.  13  ऑक्टोबर, 2022 रोजी कृषी महाविद्यालय परभणी,  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे सकाळी 09:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. यासाठी नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पना असणाऱ्या आणि युवती आणि नागरिकांनी प्रशिक्षण शिबीर व संक-या युवक - नवउद्योजक होवू इच्छिणाऱ्यांनी सादरीकरणासाठी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोगल यांनी केले आहे.

नाविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात, त्याकुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना  योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते.  परंतु काही वेळ योग्य मार्गदर्शना अभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत.  या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांच्या नाविन्यपूर्ण नवसंकल्पनांना मूर्तस्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र - प्रशिक्षण शिबिरात नाविन्यता तथा उद्योजकते बाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजकांची व्याख्याने, तज्ञ मार्गदर्शक सल्लागारांची सत्रे, तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांचे संकल्पना सादरीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. सदरीकरण सत्रात नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय व कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेलिबिलिटी (कचराव्यवस्थापन, पाणी, स्वच्छता) ई-प्रशासन, स्मार्ट पायाभुत सुविधा व गतिशीलता आणि अन्य या क्षेत्रातील आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांचे प्रत्येकी 10 मिनिटात सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ज्ञ समिती समोर करण्याची संधी देण्यात येणार असून यामधून जिल्हास्तरावर अव्वल 03 पारितोषिक विजेते घोषित केले जातील त्यामध्ये प्रथम पारितोषिक रु 25,000/- , व्दितीय पारितोषिक रु 15,000/- आणि तृतीय पारितोषिक रु 10,000/- दिले जाणार आहे. 

राज्यस्तरीय विजेत्यांची घोषणा व पारितोषिक समारोह - प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातील सर्वोत्तम 3 संकल्पना मधून राज्यस्तरीय निवड तज्ज्ञ समितीद्वारे अंतिम विजेत्यांची निवड करण्यात येईल. यामधून वरील नमूद 7 क्षेत्रातील राज्यस्तरीय विजेत्यांना प्रथम पारितोषिक रु. 1,00,000/- व द्वितीय पारितोषिक रु.75,000/- तसेच सर्वोत्कृष्ट महीला उद्योजिका यांना क 1,00,000/- असे 21 पारितोषिके दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी  मा. राज्यपाल यांचे हस्ते राजभवन मुंबई येथे वितरित करण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांना पेटेंट सहाय्य इन्क्युबेशन, सहाय्य बीज भांडवल निधीसाठीसहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन जसे सॉफ्टवेअर क्रेडीटस, क्लाऊड क्रेडीटस इत्यादी सारखे लाभही देण्यात येणार आहेत.

 महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरणासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी युवती-युवक व नाविण्यपूर्ण नवउद्योजक नागरिकांनी सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे संकेतस्थळ www.mahastartupyatra.in वर नोंदणी करावी. तसेच जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्रास दि . 13 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 09:00 वाजेपर्यंत कृषी महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांचेकडे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी 02452-220074  यावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, कौशल्य उद्योजकता व नाविन्यता रोजगार, जिल्हा कार्यकारी समिती, परभणी यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या