💥पुर्णा तालुक्याती माखणीतील भागवत आवरगंड यांचा आनोखा कौतुकास्पद ऊपक्रम....!


💥मुलाच्या वाढदिवशी ईतर खर्च न करता केले गरजू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप💥

पुर्णा (दि.१९ सप्टेंबर) - पुर्णा तालुक्यातील माखणी येथील भागवत आवरगंड यांनी आज सोमवार दि.१९ सप्टेंबर रोजी आपला इयत्ता पहिली वर्गात शिकणारा मुलगा रुद्राक्ष भागवत आवरगंड याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याचा वाढदिवस अत्यंत अनोख्या पध्दतीने साजरा करीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना वह्या व पेनीचे वाटप केले.

 येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या रूद्राक्ष वाढदिवसा निमित्त त्याचे वडिल भागवत आवरगंड यांनी ईतर खर्च नरता शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त पेन वह्या या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.यानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक .संजयकुमार जोशी सरांनी भागवत आवरगंड यांचे मनापासून आभार मानले.अश्याच पद्धतीचे उपक्रम इतर पालकांनी सुद्धा राबवावेत असे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना एक-एक पेन देण्यात आली.या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक अंगद आवरगंड, .कालीदास भुजबळ, विष्णु आवरगंड ॠषी आवरगंड भागवत आवरगंड, शाळेचे मुख्याध्यापक .संजयकुमार जोशी,राजकुमार ढगे,सुरज पौळ,गजानन पवार, राम महाजन,सुनील शेळके सर सौ.झटे मँडम आदीची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या