💥पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे सेवा पंधरवाड्या निमित्त मोफत लम्पी आजार प्रतिबंधक लशिकरन शिबीर संपन्न...!


💥लशिकरन शिबीराचे उदघाटन भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव रामकिशन रौंदळे यांनी गोमातेचे पूजन करून सुरू केले💥

पुर्णा (दि.23 सप्टेंबर) - पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे सेवा पंधरवाड्या निमित्त मराठवाडा मुक्ती संग्राम दिन दि.17 सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती 2 आक्टोंबर 2022 पर्यंत मोफत लंम्पी आजार प्रतिबंधक लशिकरन शिबीराचे उदघाटन भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव रामकिशन रौंदळे यांनी गोमातेचे पूजन करून सुरू केले.


डॉ बुचाले यांनी आजारा बाबत पशुपालकांना मार्गदर्शन केले. मंडळ अध्यक्ष अनंतराव पारवे, सरपंच शिवाजी साखरे, ग्राम विकास अधिकारी गिरटकर, दशरथ साखरे, सैनाजी माठे, विश्वनाथ हराळे, बुथ प्रमुख सर्वश्री दत्ता माठे, लखन सूर्यवंशी, चंद्रशेखर साखरे व मोठ्या प्रमाणात पशुपालक उपस्थित होते शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ भुर्के व त्यांच्या टीम ने सरकार्य केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या