💥रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे - सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे


💥कृषि महाविद्यालय लातूर येथे रक्तदान शिबीर संपन्न💥

ताडकळस प्रतिनिधी 

लातुर येथील कृषि महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचे  अमृत महोत्सवी वर्ष, वसंतराव नाईक   मराठवाडा कृषि विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सव व गणेश उत्सवाच्या निमित्ताने,  जिमखाना आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार,दिनांक ९ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. रक्तदानातून राष्ट्रसेवा व समाज   सेवेबरोबरच नि:स्वार्थ आणि निरपेक्ष अशी रक्ताची नाती तयार होवू शकतात. तसेच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ  खरे जीवनदान आहे, असे उद्गार सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी रक्तदानाचे महत्व विषद करताना रक्तदान शिबिराच्या प्रसंगी अध्यक्षीय समारोपात काढले. डॉ.ठोंबरे पुढे म्हणाले की,सामाजिक जाणिवेतून समाजसेवा व राष्ट्रसेवा या भूमिकेत कृषिचे  विद्यार्थी सदैव तत्पर असतात. आरोग्य यंत्रणेत रक्ताचा तुटवडा वेळीच भरून काढण्यासाठी अशी रक्तदान शिबिरे महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात असे मतही त्यांनी यावेळेस व्यक्त केले. याप्रसंगी उद्घाटनपर भाषणात सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक, राजेंद्र मोरे म्हणाले की, सबळ समाज निर्मितीसाठी आणि शेतकरी स्वयंपूर्ण होण्यासाठी कृषि स्नातकांनी स्वतःस झोकून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर  स्वतःची व समाजाची आरोग्यसंपदा सांभाळून सजग नागरिक व्हावे,  त्यातून देशसेवा घडते. त्यांनी असेही प्रतिपादन केले की, युवकांनी नियमित व्यायाम करून,  निर्व्यसनी असणे आवश्यक आहे. यावेळी व्यासपीठावर सेवा निवृत्त पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मोरे, डॉ.भास्कर बोरगावकर, डॉ.श्रीकांत बिरादार, डॉ.आनंद कारले, डॉ.विश्वनाथ कांबळे, डॉ.भागवत इंदुलकर, डॉ.दिनेशसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबिरात रक्त गट तपासणी, हिमोग्लोबीन तपासणीसह ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ.इंद्रमणी यांच्या संकल्पनेतून व संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ.धर्मराज गोखले, यांच्या मार्गदर्शनानुसार रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना उपाध्यक्ष डॉ.ज्योती देशमुख यांनी केले, सूत्रसंचालन डॉ.ज्ञानेश्वर सुरडकर तर उपस्थितांचे आभार रा.से.योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.अनिलकुमार कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.प्रशांत करंजीकर, डॉ.विलास टाकणखार, डॉ.विठोबा मुळेकर, डॉ.संतोष कांबळे, डॉ.व्यंकट जगताप, डॉ.विजय भामरे, डॉ.राजेश शेळके, डॉ.अनंत शिंदे, डॉ.पद्माकर वाडीकर, डॉ.नितीन तांबोळी, डॉ.दयानंद मोरे, डॉ.सुनीता मगर, डॉ.प्रभाकर आडसूळ, डॉ.शिवशंकर पोले, डॉ.संघर्ष शृंगारे, प्रा.संतोष वाघमारे, भगवान कांबळे, राहुलदेव भवाळे, अजिनाथ फाळके, देविदास चामणीकर, चक्रधर देसाई यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या