💥आम्रवण महाविहारात बाराफुट उंचीची बुद्ध मूर्ती उभारणार - सिद्धार्थ हत्तीआंबिरे


💥महाराष्ट्रातील बुद्ध विहारांना बुद्ध मूर्ती भेट देऊन धम्मचक्र गतिमान करण्याची संकल्पना💥


देवगाव फाटा/परभणी :- तथागत भगवान गौतम बुद्धांनी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत भिखुनी बुद्ध विहारात राहूनच वर्षावास करावा व धम्मप्रसार आणि प्रचाराचे चक्र गतिमान करावे असे सांगितले त्या अनुषंगाने आपणही धम्माचा प्रचार आणि प्रसार गतिमान करण्यासाठी थायलंड येथे जाऊन पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. आपणही महाराष्ट्रातील बुद्ध विहारांना बुद्ध मूर्ती भेट देऊन धम्मचक्र गतिमान करण्याची संकल्पना महाराष्ट्राचे अध्यक्ष अनुसूचित जाती विभागाचे काँग्रेस कमिटीचे सिद्धार्थ हत्तीआंभिरे यांनी आम्रवन महाविहारात आयोजित कार्यक्रमात आपले विचार मांडत असताना मी आम्रवन महाविहारात बारा फूट उंचीची बुद्ध मूर्ती उभारणार असे प्रतिपादन केले.


आम्रवन महाविहारात दिनांक 3आँगस्ट 2022रोजी जाहीर धम्मदेशना सत्कार समारंभ व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन भंन्ते रेवतबोधी यांनी केले होते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भिक्खू शरणानंद महाथेरो पाथरी, अखिल भारतीय भिक्खू संघ बुद्धगया, शाखा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी मधील महासचिव डॉ.भदंत उपयुक्त महाथेरो पूर्णा, भिक्खू मोदितानंद थेरो परभणी, भंते प्रज्ञा बोधी, भंते संघरत्न, भंते धम्मपाल यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अनुसूचित जाती विभागाचे सिद्धार्थ हत्तीआंबिरे , परभणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उपासक मिलिंद सावंत, यादवराव मोरे, नानासाहेब राऊत (माजी सदस्य जिल्हा परिषद परभणी) प्रकाश कांबळे, अशोक कांबळे, प्रा. राजेश गायकवाड, विनोद कोहिरे आदींची उपस्थिती होती.


आम्रवन महाविहार देवगाव फाटा येथे सकाळी 10.30 वाजता पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण पूज्य भिक्खु सरणानंद महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर भिक्खू संघाच्या व मान्यवरांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम तथागत भगवान बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांना भिक्खू संघाने त्रिशरण व पंचशील दिले. डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो पूर्णा यांची अखिल भारतीय भिक्खू संघ बुद्धगया, शाखा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी मध्ये महासचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल उपासक उपासिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर थायलंडचा दौरा करून आल्याबद्दल सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांचाही आम्रवन बुद्ध विहाराच्या वतीने उपासक व उपासीका यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना सिद्धार्थ हत्तीअंबिरे म्हणाले, "आम्रवण महाविहार बुद्धविहारात डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या नेतृत्वात जो कार्यक्रम आयोजित केला आहे. मी जेव्हा थायलंडला गेलो तेव्हा तेथील मोठे मोठे बुद्धविहार पाहिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आणि सम्राट अशोकाने बौद्ध धर्म का स्वीकारला याचे उत्तर आपण थायलंडचे बुद्धविहार आणि तेथील धम्माचा प्रचार पाहिल्यास लक्षात येते. बुद्धांनी सांगितले की प्राणीमात्रावर दया करा. भारतातील सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी बौद्ध राष्ट्रांना भेटी दिल्या पाहिजेत असेही ते बोलताना म्हणाले", त्यानंतर मिलिंद सावंत, प्रकाश कांबळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुढच्या कार्यक्रमात आम्रवन बुद्ध विहार देवगाव फाटा येथे डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली उपासकांना घरी पूजेसाठी 111 बुद्ध मूर्तीचे वाटप करणार असल्याचे हत्तीअंभिरे यांनी  जाहीर केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक पूज्य भिक्खू डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजकुमार कांबळे यांनी केले. तर आभार भंते रेवतबोधी यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळू पुंजाजि अंभूरे, कमलताई लोखंडे, गौतम लोखंडे, दिनकर खंदारे, विशाल कांबळे, भगवान ढाकरगे, उत्तम लोखंडे, विष्णू भाले, लक्ष्मण ढाले, रोहिदास जावळे, दिलीप काकडे आदींनी कार्यक्रम यशस्वी केला. त्याप्रसंगी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या