💥मानव मुक्ती मिशन ची परभणी जिल्हास्तरीय बैठक संपन्न....!


💥मानव मुक्ती मिशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न💥

       सांप्रत समाजव्यवस्थेत होत जानारी वेगवान स्थित्यंतरे लक्षात घेता,आज घडीला व्यापक सर्वसमावेशक भूमिका घेवून समाजव्यवस्थेत काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.या भुमीकेतून मानव मुक्ती मिशनच्या माध्यमातून सतत क्रियाशील कार्यकर्त्यांना महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन आज बुधवार दि.०७ रोजी यशवंत गुरुकुल उघडा महादेव परिसर येथे मानव मुक्ती मिशन च्या संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

        या बैठकीत संत चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी सोहद्यानिमित्त त्यांचा विचारणा व कार्याला अभिवादन करण्यात आले आणि नागपूरचे सुफी संत ताजोद्दिन बाबा यांच्या शंभराव्या उर्स निमित्त त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. व मानव मुक्ती मिशनच्या विविध जन आघाड्यांच्या शाखांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या मधे मानव मुक्ती मिशन  प्रेरित मजलिस ए इंसानियतच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी शेख अझहर व जिल्हा उपाध्यक्ष पदी काशिफ रजा यांची नियुक्ती करण्यात आली . तसेच हरिती स्त्रीदास्यांतक संघर्ष सभेच्या विभागीय अध्यक्षपदी सागरताई कांबळे, तसेच कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षक आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष पदी पांडूरंग डुकरे सर, व मानव मुक्ती मिशनच्या मानवत तालुका अध्यक्षपदी अजय हिवाळे यांची नियुक्ती करण्यात आली.

            या वेळी तालुका स्तरावर विविध बैठका घेऊन कर्यकरण्या उभ्या करण्या संधर्भात एक मताने निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मानव मुक्ती मिशनचे जिल्हा अध्यक्ष अजित कदम, जिल्हा प्रवक्ता वैभव शेटे, परभणी महानगर अध्यक्ष दीपक मगर, वसमत तालुका अध्यक्ष भिकाजी कांबळे, जत्यांतक शेतकरी शेतमजूर सभेचे जिल्हा अध्यक्ष विशाल भालेराव उपस्थित होते. मानव मुक्ती मिशन पब्लिकेशन चे प्रकाशक रामप्रसाद आंभुरे, पाथरी वरून रणवीर भाले, शिवमुद्रा संघटनेचे स. अध्यक्ष ऍड. सूर्यकांत मोगल, व्याख्याते कृष्णा भागवत, वानखेडे मधुकर, आदींची उपस्थिती होती. यावेळी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

 मानव मुक्ती मिशन ची परभणी जिल्हा बैठक संपन्न. या वेळी नितीन सावंत, अजित कदम, वैभव शेटे, दीपक मगर, शेख अझहर, काशीफ रजा, सागरताई कांबळे, पांडुरंग डुकरे, अजय हिवाळे, भिकाजी कांबळे, रामप्रसाद आंबुरे, विशाल भालेराव,रणवीर भाले, सूर्यकांत मोगल, कृष्णा भागवत, वानखेडे मधुकर....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या