💥पुर्णा रेल्वे स्थानका जवळील 'तडीपार परिसर' प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करून परिसराच्या आसपास संरक्षण भित बांधावी...!

 


💥दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सरदार उपिंदर सिंघ यांनी तात्काळ आदेश जारी करावा💥

पुर्णा (दि.२२ सप्टेंबर) - पुर्णा रेल्वे स्थानक क्रमांक चार लगतच असलेला रेल्वे प्रशासनाच्या मालकीचा तडीपार परिसर दिवसेंदिवस अतिसंवेदनशील होत असल्याचे निदर्शनास येत असून या परिसरात राज्यासह अंतरराज्यातील देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सातत्याने एकत्रित येऊन परासरात वेळोवेळी गुन्हे घडवून दहशत पसरवत असल्याचे निदर्शनास येत आहे.


या तडीपार परिसरालगत रेल्वे प्रशासनाने उभारलेली संरक्षण भिंत जागोजाग तोडून शहरात सहज घुसता येईन अश्या पध्दतीने रहदारीसाठी रस्ते बनवण्यात आल्यामुळे राज्य अंतरराज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अगदी सहजपणे गुन्हा घडवून सहीसलापत पसार होत असल्याचे दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी परिसरात एका अनोळखी तरुणीच्या निर्घृण हत्येच्या घटनेवरून स्पष्ट होत असून यापुर्वी देखील या परिसरात हत्या लुटमार चोऱ्या सारख्या अनेक घटना घडल्या असून याही पेक्षा गभीर बाब म्हणजे या तडीपार परिसरात झाड झुडप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींसह मद्यपी नशेडी तसेच प्रवासी वर्गाची लुटमार करणारे पाकीटमार चोरटे गुन्हे घडवून या परिसरात आश्रय घेत असल्यामुळे रेल्वे प्रवास करून येणाऱ्या प्रवास्यांना या मार्गानी रात्री बेरात्री येणे अत्यंत धोकादायक झाले असून या मधल्या मार्गांना तात्काळ बंद करणे व आसपास संरक्षण भिंत उभारणे रेल्वे प्रशासनासह प्रवासी वर्गाच्या देखील हिताचे होणार असल्यामुळे नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सरदार उपिंदर सिंघ यांनी हा परिसर तार किंवा वाल कपाऊटने बंदिस्त करून हा संपूर्ण परिसर सिल करून हा परिसर प्रतिबंधीत परिसर म्हणून घोषित करावा अशी मागणी होत आहे.....

💥पुर्णा रेल्वे प्रवासी वर्गाच्या सुरक्षेसह रेल्वे संपत्तीच्या सुरक्षेसाठी लोहमार्ग पोलिस कर्मचाऱ्यांची संख्य वाढवणे आवश्यक :-



 मराठवाड्यातील सर्वात मोठे जंक्शन असलेल्या पुर्णा रेल्वे स्थानकासह प्रवासी वर्ग व रेल्वे संपत्तीच्या सुरक्षेसाठी येथे निजामकाळापासून असलेले लोहमार्ग पोलिस स्थानक नांदेड येथे स्थलांतरीत करण्यात आल्यापासून पुर्णा रेल्वे स्थानक व परिसर गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी जणूकाही नंदनवनच झाल्याचे निदर्शनास येत असून येथील लोहमार्ग पोलिस चौकीत केवळ दोन/तिन कर्मचारीच असल्यामुळे रेल्वे प्रवासी वर्गाच्या सुरक्षेसह रेल्वे संपत्तीच्या सुरक्षेचाही प्रश्न वेळोवेळी गभीर स्वरूप धारण करीत असल्यामुळे नांदेड डिव्हीजनचे विभागीय व्यवस्थापक सरदार उपिंदर सिंघ यांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून येथील लोहमार्ग पोलिस चौकीसाठी एखाद्या सहाय्यक पोलिस निरिक्षकासह दहा ते बारा कर्मचारी तात्काळ उपलब्ध करून द्यावे ज्याने करून रेल्वे प्रवासी वर्गासह रेल्वे संपत्तीची सुरक्षा देखील योग्य पध्दतीने होईल.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या