💥श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे पहिले ट्रायल सफलतापूर्वक....!


💥अशी माहिती भावना ताई बोर्डीकर यांनी दिली आहे💥

जिंतूर  प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर सेलू मतदारसंघातिल शेतकरी-कष्टकऱ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांनी एक स्वप्न पाहिलं आणि आई तुळजाभवानीच्या कृपेने ते पूर्ण झालं. जिंतूर- सेलू परिसरातील कृषी क्षेत्राला नवसंजीवनी ठरणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्प श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे पहिले ट्रायल सफलतापूर्वक पार पडले. अशी माहिती भावना ताई बोर्डीकर यांनी दिली आहे.

हा शुभमुहूर्त गणेश चतुर्थी, गणेशोत्सवाच्या दिनी आडगाव कुपटा येथे ट्रायल शुभारंभ झाला मातोश्री मीनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते हे पूजन करून ट्रायल घेण्यात आलं आणि ते यशस्वीपणे पार पडलं. या साखर कारखान्यामुळे जिंतूर सेलू मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जीवनात भरभराटी येईल, याची खात्री आहे. जिंतूर सेलू मतदारसंघातील शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या