💥हिंगोली तहसील कार्यालयातील अभिलेखे गायब ?


💥मागासवर्गीय महसुल कर्मचाऱ्याची विधवा १६ वर्षापासून कुटुंब सेवानिवृत्ती वेतना पासून वंचित💥

💥तात्पुरत्या पेंशनसाठी सेवासंघाची आयुक्तांकडे मागणी💥

जिंतूर प्रतिनिधी/ बि.डी.रामपूरकर

महसुल कर्मचारी कै.सुभाष रामराव बोराडे यांची विधवा पत्नी १६ वर्षापासून कुटुंब सेवानिवृत्ती वेतनासाठी तहसील परभणी -हिंगोलीचे उंबरठे झिजवत आहे.परंतू मयत महसुल शिपायाची वैयक्तिक संचिका,मूळसेवा पुस्तिका, पगार पत्रक अभिलेखे सापडत नाही.तरी कुटुंब निव्रती वेतन नियम १९८२  चे नियम १२६ अन्वये तात्पुरते कुटुंब सेवानिवृत्ती वेतन मंजूर करावे अशी मागणी सेवानिवृत्त सेवासंघाचे तालुकाध्यक्ष एम.के.कादरी यांनी मा.सुनील केंद्रेकर साहेब विभागिय आयुक्त औरंगाबाद यांचेकडे केली आहे.

सविस्तर हे कि ,जिल्हाधिकारी परभणी यांनी दि.३ एप्रिल १९९५ रोजी शिपायांची प्राथमिक ज्येष्ठता सुची प्रसिद्ध केली.या यादीत  २३४ अनुक्रमांकावर सुभाष रामराव बोराडे यांची दि.१ आक्टोबर  १९९४ मध्ये शिपाई पदावर सेवेत रुजू झाल्याचे नमूद केले आहे..सुभाष बोराडे हिंगोली तहसील मध्ये कार्यरत असतांना दि. २७ नोव्हेंबर २००६  रोजी मयत झाले.

तहसीलदार हिंगोली यांनी दि. ६आगस्ट २०११ रोजी श्रीमती वनिता सुभाष बोराडे यांना कळविले कि , "तुमच्या कुटुंब निव्रती वेतनातील गट विमा योजनेचा  ४९७ रुपयाचा धनादेश कोषागार कार्यालयातून तहसील हिंगोली येथे प्राप्त झाला आहे तो आपण कार्यालयातून हस्तगत करुन घ्यावा."

श्रीमती वनिता सुभाष बोराडे यांनी दि.२७ आगस्ट २०२१ रोजी तहसीलदार हिंगोली यांचेकडे अर्ज केला कि , "माझे पती कै.सुभाष बोराडे यांची मूळ सेवापुस्तिका पेंशन कारवाई साठी उपलब्ध करुन द्यावी.." तसेच दि.१० जांनेवारी २०२२ रोजी तहसीलदार परभणी यांचेकडेही कै.सुभाष बोराडे यांची वैयक्तिक संचिका व मुळसेवापुस्तिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली.तहसीलदार परभणी यांनी  कळविले कि कै.सुभाष बोराडे यांची वैयक्तिक संचिका व मूळ सेवापुस्तिका या कार्यालयात आढळून येत नाही." 

श्रीमती वनिता बोराडे यांनी दि. २१ जून  २०२२ रोजी  तहसीलदार हिंगोली कडे विनंती अर्ज केला कि, " माझे दिवंगत पती कै.सुभाष रामराव बोराडे यांचे पेंशन प्रस्तावासाठी पगार बील  व पगार नोंद वहीची कागदपत्रे उपलब्ध करून द्यावी."

तहसीलदार हिंगोली यांनी तहसीलदार परभणी यांना दि. ६ जुलै २०२२ रोजी पत्र लिहीले कि, "सुभाष रामराव बोराडे मयत शिपाई यांची सेवापुस्तिका आढळून येत नाही. सदरील शिपाई हे आपल्या आस्थापनेवर नव्याने कोणत्या तारखेस पदावर रुजू झाले व कोणत्या तारखेस बदलीने तहसील हिंगोली  येथे रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले  या बाबत अवगत करावे."

यावर तहसीलदार परभणी यांनी कळविले कि ,"सुभाष रामराव बोराडे यांचे कोणतेही अभिलेखे या कार्यालयात उपलब्ध नाही."

श्रीमती वनिता सुभाष बोराडेनी दि.१ सप्टेंबर २०२२ रोजी तहसीलदार हिंगोली यांचेकडे अर्ज सादर करून विनंती केली कि, "कुटुंब सेवानिवृत्ती वेतन नियम १९८२  चे नियम १२६  अन्वये मला तात्पुरते कुटुंब सेवानिवृत्ती वेतन मंजूर करावे.

सेवानिवृत्त कर्मचारी सेवासंघ जिंतूरचे तालुकाध्यक्ष एम.के.कादरी यांनी सदरील  प्रकरणीजातीने दखल घेऊन मागासवर्गीय  महसूल कर्मचारी कै.सुभाष बोराडे यांच्या विधवेला आपल्या अधिकारातून तातडीने कुटुंब सेवानिवृत्ती वेतन मंजूर करुन द्यावे अशा मागणीचे निवेदन सेवानिवृत्त कर्मचारी सेवा संघ तालुकाध्यक्ष एम. के. कादरी यांनी मा सुनिल केंद्रेकर साहेब विभागिय आयुक्त औरंगाबाद याना पाठविले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या