💥उत्कृष्ट जिल्हा शाळां आदर्श पुरस्काराने जिंतूर तालुक्यातील इटोली जिपकेप्राचा गौरव....!


💥या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची उपस्थिती💥  

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित उत्कृष्ट आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी परभणीत घेण्यात आला. यामध्ये मान्यवरांच्या हस्ते शिक्षक तसेच शाळा, गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी अंचल गोयल अध्यक्षस्थानी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मार्गदर्शक कोल्हापूर येथील साहित्यिक डॉ सुनीलकुमार लवटे, डॉ रामेश्वर नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, सचिन कवठे, कवी इंद्रजीत भालेराव, हवामान अभ्यासक पंजाब डक, कृषी भूषण कांताराव देशमुख, दादासाहेब टेगसे, अनिल नखाते, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, आशा गरड यांच्यासह उपशिक्षण अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, आणि जिल्ह्यातील शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी जिंतूर तालुक्यातील इटोली येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गुणगौरव करण्यात आला.

मान्यवरांच्याहस्ते प्रशस्ती सन्मानपत्र, ट्रॉफी व पुष्पहार श्रीफळ देऊन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इटोली येथील मुख्याध्यापक भास्कर जुमडे, व सहशिक्षक भास्कर चव्हाण, परमेश्वर मेनकुदळे, गजानन काळे, श्रीमती कौशल्या नागरगोजे, श्रीमती मीरा दाडगे आदि आदर्श शाळा पुरस्काराने गौरविण्यात आले. यामुळे शाळेतील मुख्याध्यापक व सहशिक्षकांचे इटोली नगरीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या