💥सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरू - मा.आ.विजयराव भांबळे


💥जिल्हा परिषद पंचायत समिती येणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे💥

जिंतूर प्रतिनिधी /बी.डी.रामपूरकर

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या सभासद नोंदणी अभियान अंतर्गत आज पक्षाच्या क्रियाशील व प्राथमिक सभासद नोंदणीसाठी मा.आ.विजयराव भांबळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जिंतूर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक मौलाना हुसेन मदनी हॉल, जिंतूर येथे पार पडली. त्यात ग्रामीण व शहरामधील प्रमुख कार्यकर्त्यांना सभासद नोंदणी फॉर्मचे वाटप करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमात बोलताना मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांनी सांगतिले कि, मागील बऱ्याच दिवसापासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे, शासनाने मदत करण्याएवजी अतिवृष्टीच्या यादीतून जिंतूर तालुका वगळला आहे. तसेच जिंतूर तालुक्यात ग्रामीण भागात वेळेत ट्रान्सफार्मर न मिळाल्यामुळे सामान्य नागरिकांना बऱ्याच आडचणींना सामोरे जावे लागत आहे, मागील वर्षीच्या पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. तसेच मागील तीन वर्षाच्या काळात संजय गांधी व श्रावणबाळ योजने अंतर्गत लाभार्थ्याची एकही पगार मंजूर करण्यात आलेली नाही. आशा प्रकारचे  गंभीर विषय निर्माण झालेले असून  विद्यमान आमदारांच्या विचाराचे देशात व राज्यात सरकार असून त्या या प्रश्नांकडे गंभीरतेणे बघताना दिसून येत नाहीत. यापुढे जनेतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक मार्गाने शासनास सर्व प्रश्न सोडवण्यास भाग पाडू असे आश्वासन दिले. व प्रत्येक गावातील व शहरातील नागरिकांचे कामे करा व कुठे आडचन आल्यास मला कळवा  तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा विचार गावा गावात घेवून जा व  येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, बाजार समिती व ग्रामपंचायत आशा निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. असे आवाहन भांबळे  साहेबांनी केले.

या कार्यक्रमात गजानन कुटे रा.धानोरा, जावेद पठाण रा.जिंतूर व शेषेराव महाळनर, पिंटू वलेकर रा.हिवरखेडा ई.नी मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला, त्यांचे रुमाल व हार घालून पक्षात स्वागत करण्यात आले. 

या कार्यक्रम प्रसंगी प्रसादराव बुधवंत, रामराव उबाळे, मनोज थिटे, सबिया बेगम कपिल फारुकी, बाळासाहेब भांबळे, बाळासाहेब घुगे, मनीषाताई केंद्रे, गणेशराव इलग, शरदराव मस्के, विजय खिस्ते,किरण दाभाडे, मनोहर डोईफोडे, उस्मान पठाण, शाहेद बेग मिर्झा,  दत्तराव काळे,  दलमीर पठाण, आहेमद बागवान, चंद्रकांत बहिरट,  आशाताई खिल्लारे यांच्यासह ग्रामीण व शहरातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या