💥परभणी जिल्ह्यातील ११ शिक्षकांना मिळणार जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार....!


💥पुर्णा तालुक्यातून आबनराव पारवे गुरुजींचा समावेश : सिईओंच्या मार्गदर्शनात झाल्या उत्कृष्ट शिक्षकांच्या निवडी💥 

परभणी (दि.०५ सप्टेंबर) दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट आणि उल्लेखनीय  कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना जिल्हास्तरावर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दिला जातो. २०२२ - २३ यावर्षी  देखील जिल्ह्यातील ११ जिल्हा परिषद शिक्षकांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिली आहे.

मुख्य कार्यकारी आधिकारी यांच्या मार्गदर्शनात आणि पारदर्शक झालेल्या निवड प्रक्रियेत जिल्हा परिषद शाळेतील ९ प्राथमिक शिक्षक आणि २ माध्यमिक शिक्षक अशा एकूण ११ उत्कृष्ट शिक्षकांच्या निवडी करण्यात आल्या असून सदर शिक्षकांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  

💥या शिक्षकांना मिळणार उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार :-

१.दत्तात्रय दिगंबरबुवा परबत (प्रा.शा. भेंडेवाडी. ता.गंगाखेड), २.शेख इकबाल इस्माईल (प्रा.शा.चारठाणा - उर्दू ता.जिंतूर), ३.मायादेवी अंकुश गायकवाड (प्रा.शा.उक्कलगाव ता.मानवत), ४.सुभाष मोतीराम चव्हाण (प्रा.शा.वाडी खु. ता. पालम), ५ सुधाकर अशोकराव गायकवाड (प्रा.शा.पिंपरी देशमुख ता. परभणी), ६.सोमनाथ पंडितराव डोंगरे (प्रा.शा.माळीवाडा. ता. पाथरी), ७.आबनराव भावराव पारवे (प्रा.शा.फुकटगाव ता. पूर्णा), ८.पद्माकर बाबुराव गौंडगे (प्रा.शा.देऊळगाव गात ता सेलू). ९.श्रीमती रंजना बलभिम डोंगरे (के.प्रा.शा.सोनपेठ ता.सोनपेठ), माध्यमिक शिक्षक १०. प्रतिमा विठ्ठलराव वाव्हुळे (जि. प. जांब ता. परभणी) ११.राम परसराम आतराम (जि.प. प्रशाला शेळगाव ता. सोनपेठ) अशा ११ शिक्षकांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.

उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी तालुकास्तरावरून प्रस्ताव मागविले जातात यामधून प्राप्त प्रस्तावांपैकी  प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड केली जाते. सन २०२२-२३ या वर्षीच्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी प्राथमिक शिक्षक १.जिंतूर - ७, २.सेलू - ३, ३.मानवत - २. ४. पाथरी - १. ५.सोनपेठ - ३. ६.गंगाखेड - ३. ७.पालम - १. ८.पूर्णा - ४. ९.परभणी - ६ तर माध्यमिक शिक्षका मधून परभणी व सोनपेठ तालुक्यातून प्रत्येकी एक या प्रमाणे प्रस्ताव प्राप्त झाले होते.

💥अशी केली निवड समितीने उत्कृष्ट शिक्षकांची निवड :-

पठाण शौकत उपशिक्षणाधिकारी परभणी यांच्या अध्यक्षतेखाली छाणणी समितीचे गठण करुन प्राप्त सर्व प्रस्तावांची छाननी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी मा. शिक्षणाधिकारी प्रा.या चार सदस्यीय समिती मार्फत प्रत्येकी १० गुणांच्या मर्यादेत  गुणांकन करुन एकुण ४० गुणांपैकी सर्वाधिक गुणप्राप्त उत्कृष्ट शिक्षकांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. 

सीईओ यांच्या विशेष निगराणीत केवळ गुणवत्तेच्या आधारे वस्तूनिष्ठ व पारदर्शक पद्धतीने करण्यात आलेल्या उत्कृष्ट शिक्षक निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निश्चित  केलेल्या नविन मानांकनामुळे ही उत्कृष्ट शिक्षकांची निवड पारदर्शक झाल्याचे बोलले जात आहे. दि. ९ सप्टेंबर २०२२ रोजी निवड समिती आणि शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार संबंधित ११ उत्कृष्ट शिक्षकांचा जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी दिली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या