💥पुर्णेतील नितीन खर्गखराटे खुन प्रकरणातील दोन आरोपींना आजन्म कारावासासह प्रत्येकी अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा...!


💥परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल💥

पुर्णा (दि.२२ सप्टेंबर) - येथील रेल्वे क्वार्टर परिसरातील सिमेंट रस्त्यावर दि.२५ सप्टेंबर २०२० रोजी सातत्याने दारू पिण्यासाठी पैसे मागून त्रास देतो या कारणावरून नितीन खर्गखराटे या युवकाचा धारदार शस्त्राने गळा कापून खुन केल्याची घटना घडली होती या घटने संदर्भात मयताची बहिण दिपीका खर्गखराटे यांच्या फिर्यादी वरून पुर्णा पोलिस स्थानकात गुरनं.२९७/२०२० कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकरणात घटना झाल्यावर पुर्णा पोलिस स्थानकाचे तत्कालीन पो.नि.गोवर्धन भुमे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी नितीन यास सरकारी दवाखान्यात दाखल केले होते परंतु त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता यावेळी झालेल्या तपासात सदर गुन्हा आरोपी विकास चौदंते व रोशन इंगोले यांनी मयत सतत दारू साठी पैसे मागून त्रास देतो या कारणांमुळे त्याचा खुन केल्याचे सांगितले होते.

या नितीन खर्गखराटे खुन प्रकरणाची सुनावनी दरम्यान अभियोग पक्षातर्फे एकून १५ साक्षिदार तपासण्यात आले तसेच वैद्यकीय अहवाल व आरोपींच्या अंगावरील रक्त,शस्त्रावरील रक्त,मयताचे रक्त यांचा अहवाल सकारात्मक आला या घटनेतील मयत नितीन खर्गखराटे व आरोपी हे घटनेच्या दिवशी एकत्र दारू पिल्याचेही साक्षिदार यांनी जवाबात सांगितले.

सदर गुन्ह्याचा सखोल तपास तत्कालीन पो.नि.गोवर्धन भुमे यांनी करीत आरोपीं विरोधात दोषारोप मा.न्यायालयात दाखल केला तसेच या प्रकरणी त्यांना तत्कालीन सपोनि.प्रविण धुमाळ,पोलिस अंमलदार रत्ने व चन्नावार यांनी तपासात मदत केली मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.मनोज एस.शर्मा साहेब यांनी आज गुरुवार दि.२२ सप्टेंबर २०२२ रोजी या प्रकरणातील आरोपी विकास चौदंते व रोशन इंगोले यांना कलम ३०२ अन्वये आजन्म कारावासासह प्रत्येकी २,५००/-रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

सदरील खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ॲड.श्री.ज्ञानोबा दराडे व सहाय्यक संचालक श्री.सुहास कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड.श्री.आशिष दळे यांनी सरकार पक्षातर्फे यशस्वी बाजू मांडली तसेच परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक श्री जयंत मिना साहेब व अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक श्री मुम्मका सुदर्शन साहेब यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सपोनि.कपिल शेळके,कोर्ट पैरवी अंमलदार पोउपनि.सुरेश चौहाण,पोह.राजु दहिफळे,प्रमोद सुर्यवंशी यांनी काम पाहिले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या