💥परभणी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणी साठी प्रहार जनशक्ती पक्षाने केले आगळे वेगळे आंदोलन....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात फेकले सुकलेले कापूस व सोयाबीनचे पिक💥

परभणी (दि.०४ सप्टेंबर)  - जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना  जिल्हाधिकारी कार्यालयात एकही अधिकारी न भेटल्याने संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयात सोबत आणलेले सोयाबीन व कापसाचे  वाळलेले झाडे टाकून जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध केला.अचानक झालेल्या या घोषणाबाजी जिल्हाधिकारी कार्यालयात एकच गोंधळ उडाला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नायब तहादिलदार श्री. चव्हाण यांनी निवेदन स्वीकारले.

जिल्हयामध्ये मागील एक महिन्यापासून पाऊस न झाल्याने सोयाबीन व कापसाचे पीक हातचे गेल्यात जमा आहे. पावसाने ओढ दिल्याने पिकानी माना टाकल्या असून अनेक ठिकाणी सोयाबीन कापूस पावसाअभावी व प्रचंड उष्णतेमुळे पिवळे पडले आहेत असे असतांना देखील जिल्हा प्रशासन व कृषि विभाग मात्र कुंभकर्णाच्या झोपेत आहे . जिल्हयाभरामध्ये असमानी संकट असताना आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाला कुठल्याही प्रकारच्या दिलासा देण्याच्या मनस्थितीत जिल्हा महसुल प्रशासन दिसुन येत नाही. आता जरी पाऊस चांगला झाला तरी झालेले नुकसान भरून निघणे शक्यच नाही. जिल्हयामध्ये मागील ३० दिवसापासुन पाऊस नाही  त्यामुळे सोयाबीन व कापूस पिकाच्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करणे व जिल्हयात कोरडा दुष्काळ जाहिर करणे आवश्यक आहे.

 जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये ५० टक्के  पिकाचे नुकसान झाले होते आणि आता उरलेल्या ५० टक्के पिकाचे पावसाने ओढ दिल्याने व वाढलेल्या तापमानामुळे नुकसान झाले आहे . जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हयातील पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते परंतू त्याही वेळी जिल्हा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पंचनामे होऊ शकले नाही त्यामुळे परभणी जिल्हयाचे नाव ओला दुष्काळग्रस्त जिल्हयाच्या यादीतुन वगळण्यात आले त्या मुळे प्रशासनाचा निष्काळजीपणाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे.

जिल्हाधिकारी यांनी तात्काळ परभणी जिल्हयामध्ये कोरडा दुष्काळ जाहिर करुन सोयाबीन व कपासाच्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत मिळाली म्हणून राज्य शासना कडे शिफारस करावी असे या निवेदनात म्हंटले आहे.निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख माधवीताई घोडके, उप जिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, शेतकरी आघाडी तालुकाप्रमुख सय्यद मुस्तफा, दिव्यांग आघाडी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमूद्रे, महिला आघाडी शहर प्रमुख आरतीताई जुमडे, सर्कल प्रमुख श्याम भोंग, मीडिया प्रभारी नकुल होगे शहर चिटणीस वैभव संघई, उद्धव गरुड, माऊली गरुड, सचिन शेरे, दतराव रवंदळे, मुंजा गरुड, श्रीधर गरुड, शेख नाझेर इत्यादींच्या स्वाक्षर्‍या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या