💥परभणी जिल्ह्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय अनुदानासह पिक विमा द्या...!


💥राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदनाद्वारे 'छावा' कडून मागणी💥

परभणी/पुर्णा (दि.२४ सप्टेंबर) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा शहरात आज शनिवार दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हिंदुगर्व गर्जना शिवसेना संपर्क यात्रे निमित्त आले असता छावा मराठा संघटना महाराष्ट्र या संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन सवराते यांच्या नेतृत्वाखालील छावाच्या शिस्टमंडळाने त्यांची भेट घेऊन त्यांना जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय अनुदानासह पिक विमा देण्या संदर्भात निवेदन दिले या निवेदनात असे नमुद केले आहे की परभणी जिल्ह्यात दि.११ आगस्ट २०२२ ते ०३ सप्टेंबर २०२२ असा तब्बल २४ दिवसांचा पाऊसाचा खंड पडला होता या पावसाच्या खंडामुळे परभणी जिल्ह्यात हजारो हेक्टर पिके पाऊस न पडल्यामुळे पुर्णपणे होरपळून गेलेली आहेत.

तर जुलै महिण्यात सतत एक महिना अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे सखल क्षेत्रातील खरीप पिके बाधीत झाली त्यानंतर आगस्ट महिन्यात एकदमच पाऊस उघडून २४ दिवस पावसाचा खंड पडला खंडामूळे टेकड्यांच्या उंचवट्यावरील सोयाबीन पिक व अन्य इतर खरीप पिक कशीबसी तग धरून राहीली होती तिही पिक पावसाच्या खंडामुळे वाळून गेली अनेकवेळा शेतकऱ्यांनी तहसिलदार पुर्णा व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिली तरीही सरसकट अनुदान व पिकविमा देण्याची कुठलीही हमी दिलेली नाही त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री या नात्याने आपण परभणी जिल्ह्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना शासकीय अनुदानासह तात्काळ विकविमा मिळवून द्यावा असे छावाने दिलेल्या निवेदना म्हटले असून या निवेदनावर छावाचे जिल्हाध्यक्ष गजानन सवराते,उपसरपंच उध्दवराव सवराते,तिरूपती सवराते आदींच्या स्वाक्षरी आहेत.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या