💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या अपडेट हेडलाईन्स बातम्या.....!


💥फॉक्सकाॅन गुजरातला नेण्याचा निर्णय पुर्वीच घेतलेला -- अनिल अग्रवाल 

 ✍️ मोहन चौकेकर                                                                 

* फाॅक्सकाॅनपेक्षा मोठा प्रकल्प आणु हे सांगणे म्हणजे रडणाऱ्या लहान मुलाची समजुत काढण्यासारखं-- शरद पवार

* फॉक्सकाॅन गुजरातला नेण्याचा निर्णय पुर्वीच घेतलेला -- अनिल अग्रवाल 

* काॅन्टक्टरला मिळालेले कॉन्टॅक्ट कॅबीनेटमंत्री संदिपान भुमरे यांच्या जावयाला डायरेक्ट रजिस्टीच करुन घेतली -- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

*लक्षण नसतानाही आता केवळ ब्लड टेस्टमधून होणार कर्करोगाचे निदान कर्करोगावर वेळेत निदान होणं आणि तातडीनं उपचार सुरु होण्यासाठी एक नवी चाचणी विकसित झाली आहे. यामुळं कर्करोगाच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

* 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील 8  जिल्हात होणार ध्वजारोहण औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेडमध्ये होणार ध्वजारोहण.

*आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या यशामुळे १६ सप्टेंबर रोजी साजरा होणारा राष्ट्रीय सिनेमा दिवस  २३ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

* गोव्यात  8 काँग्रेस आमदारांनी आपण भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं स्पष्ट केले. यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी देवाने सांगितल्यामुळे काँग्रेस सोडली असल्याचं वक्तव्य केले आहे.

* राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का,यावर अजून विचार केलेला नाहीय - शरद पवार.* 

* विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा टोला; दुसऱ्या प्रकल्पाची गाजर दाखवू नका वेदांताच महाराष्ट्रात आणा. वेदांता प्रकल्पही ठेवा आणि दुसरा मोठा प्रकल्पही महाराष्ट्रात आणा. जास्त लोकांना काम मिळालं तर काही बिघडत नाही.

* सैराट सिनेमातील प्रिन्स ही भूमिका साकारणारा सूरज पवारला अटक होण्याची शक्यता आहे. मंत्रालयात नोकरीचं आमिष देऊन शिर्डीतील एका व्यक्तिला फसवल्याचा आरोप सूरजवर आहे.

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या