💥आई-वडिलां सारखेच गुरुला महत्त्व असते - प्रोफेसर डॉ.पांडुरंग भुताळे


💥राष्ट्रीय सेवा योजना व तत्वज्ञान विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते💥

पूर्णा (दि.०७ सप्टेंबर ) - आई-वडिलां सारखेच गुरुचे महत्व असते.आई वडील हे पहिले गुरु असले तरी शिक्षक हा जीवनाला आकार देणारा दुसरा महत्त्वाचा गुरु असतो म्हणून समाजात आई-वडिला सारखेच शिक्षकांनाही आदर युक्त सन्मानाने  पुजले जाते असे प्रतिपादन प्रोफेसर डॉ.पांडुरंग भुताळे यांनी केले. ते स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व तत्वज्ञान विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक दिन व आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.


आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक सारख्या थोर महापुरुषांनी केलेल्या कार्यामुळे व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यामुळे आज आपण शिक्षण घेत आहोत तसेच डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयात एम. ए. करून ज्ञानसाधना केली व भारताचे पहिलेउ राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली हे एका शिक्षकाचे कर्तृत्व  आदर्शवत असल्याचेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. म्हणून विद्यार्थ्यांनी अपार कष्ट घेऊन मोठे होण्याचे स्वप्न पाहिले  तरच महापुरुषांचा वारसा आपण चालू शकतो असेही ते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष कु-हे हे होते तर  यावेळी IQAC समन्वयक डॉ. भीमराव मानकरे हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.प्रभाकर सूर्यवंशी यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रभाकर कीर्तनकार यांनी केले तर आभार सांस्कृतिक प्रभारी प्रा. डॉ.प्रकाश सूर्यवंशी यांनी मानले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या