💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट/ हेड लाईन्स/ बातम्या....!


💥चीनची चमचेगिरी करणाऱ्यांना मिरच्या का झोंबल्या”, राहुल गांधींच्या टी शर्टवरुन नाना पटोलेंचा खोचक सवाल💥

✍️ मोहन चौकेकर                                  

* मुंबई मध्ये उद्धव ठाकरे व शिंदे गटामध्ये तुफान राडा दोन्ही गटाकडन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप

* विठ्ठल मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी 7 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

* एकनाथ शिंदेंच्या सभेला हजर राहणाऱ्यांसाठी नाष्टा,जेवण आणि रोख रकमेची व्यवस्था ? अंबादास दानवेंचे गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.

* “विरोधकांना स्वप्नातही एकनाथ शिंदे दिसतात, आता त्यांना..”, श्रीकांत शिंदेंची ठाण्यात टोलेबाजी श्रीकांत शिंदे म्हणतात, …हे विरोधकांच्या डोळ्यांत खुपायला सुरुवात झाली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. ये तो केवल झाँकी है, पूरी पिक्चर अभी बाकी है!”

*अमरावतीमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणूकीत दोन गटामध्ये झाला तुफान राडा ; आमदार देवेंद्र भुयार यांना झाली धक्काबुक्की

* पावसाच्या मुसळधार सरी, झाड पडल्याने घराचे नुकसान हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा तालुक्यात पावसाच्या मुसळधार सरी पडत असून उर्वरित ५ तालुक्यांमध्ये हलका पाऊस झाला.

* “तुमच्यासारखे छक्के-पंजे…”, भाजपाच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचा पलटवार ; रऊफ मेमनला नेमकं कोण कोण भेटलं? किशोरी पेडणेकर म्हणतात, “एका स्त्रीवर तुम्ही आक्षेप घेता. राजकारणातल्या स्त्रियाही तुम्ही नाही सोडणार. सत्ता मिळवा, पण काम करून मिळवा. 

* चीनची चमचेगिरी करणाऱ्यांना मिरच्या का झोंबल्या”, राहुल गांधींच्या टी शर्टवरुन नाना पटोलेंचा खोचक सवाल “अमित शाहांनी फालतू उपद्वाप बंद करावेत. त्याऐवजी त्यांनी देशाची सीमा सुरक्षा, महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या समस्यांवर बोलावे”, असा सल्ला नाना पटोले यांनी दिला आहे

* अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारकडून दिलासा! ३ हजार ५०१ कोटी जिल्ह्यांना सुपूर्त* अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे

* भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार! आज ‘तारागिरी’ युद्धनौकेचे जलावतरण जवळपास ३५१० टनची युद्धनौका नौदलाला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. ब्युरो ऑफ नेव्हल डिझाईनच्या माध्यमातून या युद्धनौकेचे डिझाईन करण्यात आले आहे.

* “तुम्ही काळजी करू नका” सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ विधानावरून चंद्रकात पाटलांचा टोला भाजपा नेते आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.

* शिक्रापुरात जीवाचा थरकाप उडवणारा अपघात, भरधाव कंटेनरने कारला २ किमी फरफटत नेले या कारमध्ये चार जण प्रवास करते होते. हे  चारही जण बचावले आहेत.

* तेंडुलकरची बॅट पुन्हा तळपली ; दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सचिनचा ‘हा’ एक शॉट खाऊन गेला भाव स्वतः क्रिकेटचा देव इतक्या मोठ्या कालावधीनंतर समोर खेळताना पाहून सर्वांना १९९६ ची आठवण झाली.....

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या