💥परभणी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी...!


💥राज्याचे कृषी मंत्री पुर्णेत आले असता शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली मागणी💥

परभणी/पुर्णा (दि.२४ सप्टेंबर) - महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आज शनिवार दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी शिवसेना (शिंदे) गट कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यासाठी पुर्णेत आले असता शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम तालुका प्रमुख कालिदास काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाळे त्यांची झिरोफाटा येथे ताफा अडवून भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली.  


 
शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या असंख्य शिवसैनिकांनी यावेळी 'पन्नास खोके गद्दार ओके' परभणी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळालीच पाहीजे शेतकऱ्यांच्या हक्काचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे अश्या गगनभेदी घोषणाही दिल्या यावेळी शिवसेना तालुका प्रमुख कालिदास काळबांडे,शिवसेना शहर प्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या