💥परभणी महानगर पालिकेच्या नुतन आयुक्तपदाचा पदभार तृप्ती सांडभोर यांनी स्विकारला...!


💥पनवेल मनपा अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांची नगरविकास मंत्रालयाने परभणी मनपा आयुक्त म्हणून बदली केली💥

परभणी (दि.०१ सप्टेंबर) : परभणी महानगर पालिकेच्या नुतन आयुक्त पदाचा पदभार आज गुरुवार दि.०१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळच्या सुमारास आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी स्विकारला आहे.

             पनवेल महानगरपालिकेंतर्गत अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांची नगरविकास मंत्रालयाने परभणी महापालिका आयुक्त म्हणून बदली केली. त्याप्रमाणे सांडभोर या गुरुवारी सकाळी परभणीत दाखल झाल्या. त्या पाठोपाठ मावळते आयुक्त देविदास पवार यांच्याकडून त्यांनी महापालिका कार्यालयात जावून आयुक्त पदाचा पदभार स्विकारला.

             यावेळी महापालिकेंतर्गत अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या