💥जिंतूर तालुक्यातील सावळी बु.जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहार चोरट्यांनी केला लंपास जिंतूर पोलिसात तक्रार दाखल...!


💥पोषण आहाराचा माल ठेवलेल्या वर्ग खोलीचे कुलूप तोडून माल केला लंपास💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील सावळी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहाराचा माल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 8 सप्टेंबर रोजी उघडकीस आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील सावळी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व इतर   शिक्षक ८ सप्टेंबर रोजी शाळेत आले असता त्यांना पोषण आहाराचा माल ठेवलेल्या वर्ग खोलीचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले.

संपूर्ण वर्गखोलीची पाहणी केली असता, शालेय पोषण आहाराचा माल चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामध्ये तांदळाचे 50 किलो वजनाचे 5 कट्टे, मुगडाळ 45 किलो वजनाचा एक कट्टा, वटाणा 45 किलो वजनाचा एक कट्टा, हरभरा 45 किलो वजनाचा एक कट्टा, असा एकूण 22 हजार 850 रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला याबाबत शाळेचे मुख्याध्यापक नागेश डोळे यांच्या तक्रारीवरून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जिंतूर पोलीस करत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या