💥पुर्णेतील श्री गुरू बुद्धीस्वामी महाविद्यालयात 'मराठवाड्याचा आर्थिक मागासलेपणा' या भित्तीपत्रकाचे विमोचन.....!

 


💥या भित्तीपत्रकाचे विमोचन संस्थेचे  सचिव अमृतराज कदम यांच्या हस्ते करण्यात आले💥

पूर्णा. (दि.२७ सप्टेंबर) - येथील श्री गुरू बुद्धीस्वामी महाविद्यालयात  राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह दिनाचे औचित्य साधून 'अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष' , राष्ट्रीय सेवा योजना आणि अर्थशास्त्र विभागाच्यावतीने 'मराठवाड्याचा आर्थिक मागासलेपणा' हा विशेषांक भित्तीपत्रकाच्या माध्यमातून  प्रकाशित केला. राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह दिनानिमित्त अर्थशास्त्र विभागाच्या वतीने "मराठवाड्याचा आर्थिक मागासलेपणा" या भित्तीपत्रकाचे विमोचन संस्थेचे सचिव अमृतराज कदम ,सहसचिव प्रा.गोविंदरावजी कदम आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के .राजकुमार  यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या प्रसंगी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. कुलदीप कदम ,प्रा. बालाजी असोरे,  डॉ. वर्षा धुतमल  आणि महाविद्यालयातील डॉ. दिशा मोरे,डॉ.रेखा पाटील,  डॉ. स्मिता जमदाडे डॉ.वृषाली आंबटकर , डॉ.उषा मगरे आणि प्रा. संदीप शिंदे यांची उपस्थिती होती .या वेळी  बी.ए .द्वितीय वर्षाच्या दिपाली लोखंडे,योगेश्वरी सोनटक्के,अश्विनी पडोळे आणि निकिता कदम या विद्यार्थ्यांनी   मराठवाड्याचा आर्थिक विकास आर्थिक  मागासलेपणा आणि आर्थिक मागासलिपणाची कारणे व उपाय योजना याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.  सदरील भित्तीपत्रक प्रकाशित करण्यासाठी  अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. कुलदीप कदम प्राध्यापक बालाजी असोरे आणि प्रा. डॉ.वर्षा धुतमल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी दिपाली लोखंडे ,योगेश्वरी सोनटक्के ,अश्विनी पडोळे आणि निकिता कदम याशिवाय महाविद्यालयातील इतरही विद्यार्थी उपस्थित होते या   विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या